Satara : ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरुन गोळीबार, प्रचंड खळबळ

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरुन भोळी (ता. खंडाळा) गावात एकावर गोळीबार करण्यात आला. शनिवारी (दि. 27) सांयकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत निरंजन सोमनाथ चव्हाण (रा. भोळी) यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सूरज मोहन भोसले (रा. तोंडल) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरुन सूरज भोसले याने त्याच्या मित्रासह फिर्यादीच्या घरासमोर येऊन मारण्याची धमकी दिली.

तसेच छरे असलेल्या बंदुकीने फायरींग केले. तसेच भोसले यांने पिकअप वाहन भरधाव वेगात चालवले. यावेळी पिकपच्या धडकेत रस्त्यावर बसलेली कुत्रीही मरण पावली. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली. पोलिस हवालदार मदन वरखडे तपास करत आहेत.