‘या’ विकेंडला ‘हे’ 4 मोठे सिनेमे ‘रिलीज’ ; ‘या’ स्टारकिडची होणार ‘अग्निपरीक्षा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साधारणपणे शुक्रवारची सर्वजण वाट पहात असतात. खास करून शुक्रवारी जेव्हा एखादा सिनेमा रिलीज होणार असतो तेव्हा जास्त शुक्रवारची वाट पाहिली जाते. या विकेंडलाही बॉलिवूडमधील असे काही सिनेमे रिलीज होत आहेत ज्यांची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पहात आहेत. असे काही सिनेमे आहेत जे फिल्मी फ्रायडेच्या कॉलममध्ये आहेत आणि तुम्ही ते सिनेमे एन्जॉय करू शकता. या पॅकेजमध्ये बॉलिवूड तसेच हॉलिवूडमधीलही सिनेमे आहेत.

1) मलाल – हा सिनेमा यामुळे खास आहे की, या सिनेमात बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाळी आपली भाची शर्मिन सहगल आणि जावेद जाफरीचा मुलगा मीजान जाफरीला लाँच करत आहेत. मंगेश हादावाले यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. संजय लीला भंसाळी, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि महावीर जैन यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाचे ट्रेलर आणि गाण्यांनी आधीच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की, हे स्टारकिड किती कमाल दाखवतात.

2) स्पायडरमॅन फार फ्रॉम होम –  हॉलिवूडमधील एक मोठी फ्रेंचाईजी असणाऱ्या स्पायडरमॅन सीरीजचा पुढील सिनेमा स्पायडरमॅन फार फ्रॉम होम हा सिनेमा तुम्ही विकेंडला एन्जॉय करू शकता. हा सिनेमा गुरुवारी रिलीज झाला आहे. हा सिनेमा अॅव्हेंजर्स सीरीजच्या चौथ्या फेजमधील पहिला सिनेमा मानला जात आहे. स्पायडरमॅन फार फ्रॉम होम या सिनेमाची गोष्ट तिथून सुरु होते जिथून अॅव्हेंजर्स एंडगेमची स्टोरी संपली आहे. या सिनेमात स्पायडरमॅनला आयर्नमॅन दुखात बुडालेला दिसणार आहे. हेही दाखवलं जाणार आहे की, त्याला सुपरहिरोची ड्युटी सोडून सुट्ट्या एन्जॉय करायच्या आहेत. परंतु अॅव्हेंजर असण्याची जबाबदारी त्याला असं करू देत नाही. तो पुन्हा या सगळ्या झमेल्यात ओढला जातोच.

3) वन डे : जस्टिस डिलिवर्ड – अनुपम खेर आणि ईशा गुप्ताचा अॅक्शन थ्रिलर सिनेमा  वन डे : जस्टिस डिलिवर्ड या विकेंडला रिलीज होत आहे. या सिनेमात त्यांच्याव्यतिरीक्त कुमुद मिश्रा आणि अनुस्मृती सरकार प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमात अनुपम खेर सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत जे अयोग्य निर्णय देतात आणि अपराध्यांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करतात. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना जाणीव होते की, त्यांनी चुकीचं केलं आहे. यानंतर त्या अपराध्यांचा शोध घेण्यासाठी ते परत जातात. नंतर ते त्यांना त्यांचा गुन्हा स्विकार करायला लावतात आणि शिक्षाही देतात. न्यायाधीशाच्या भूमिकेत अनुपम खेर यांना पाहणे नक्कीच रंजक असणार आहे.

4) हमे तुमसे प्यार कितना –  कुबूल है, नागिन 2, आणि बिग बॉसमध्ये दिसलेला छोट्या पडद्यावरील स्टार करणवीर बोहरा याच्या होम प्रॉडक्शनमधील पहिला सिनेमा हमे तुमसे प्यार कितना या विकेंडला तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत आहे. करणवीरने या सिनेमात अशा प्रियकराची भूमिका साकारली आहे जो एकतर्फी प्रेमात पागल आहे आणि आपले प्रेम मिळवण्यासाठी प्रत्येक मर्यादा ओलांडत आहे. तुम्हीही  करणवीरचा हा अंदाज पाहू शकता.