दररोज 14 रूपये भरा अन् वर्षाला 10.20 लाखांचं पेन्शन घ्या, मोदी सरकार ‘या’ योजनेत करणार मोठा बदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन वर्षात महत्त्वाची योजना आणण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आपल्या पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सरकार अटल पेन्शन योजनेत(Atal Pension Yojna) मोठी सुधारणा करणार असून सरकार ही योजना नव्याने लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेअंतर्गत सध्या महिन्याला 5 हजार रुपये निवृत्ती वेतन म्हणून मिळतात, त्या रकमेत सरकार वाढ करणार असून आता 10 हजार रुपये पेन्शन मिळण्याची शक्यता आहे. यासंबंधीचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे आला असून लवकरात लवकर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या योजेसंदर्भातील अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या ही योजना 18 ते 40 वयोगटासाठी आहे. सरकार नवीन नियमात या योजनेत सहभागी होणाऱ्यांसाठीचे वय वाढविण्याचा विचार करत असल्याचे समजते आहे. कारण, सध्याच्या नियमांनुसार 18 वर्षांचा नागरीक या योजनेत पैसे भरू शकतो. 18 वर्षांसाठीच्या लोकांची पेंन्शनची मर्यादा 5 हजार रुपये आहे. त्यासाठी त्यांना महिन्याला 210 रुपये भरावे लागतात. त्यामुळे नवीन नियमानुसार जे पेन्शनची मर्यादा 10 हजार झाली तर त्याच व्यक्तिला महिन्याला 420 रुपये भरावे लागतील. म्हणजे 60 वर्षानंतर त्याला महिन्याला 10 हजार किंवा वर्षाला 1.20 लाख रुपये मिळतील.

दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे रुपयाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे समजते आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत 71.80वर गेली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे जगभरातल्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापेक्षा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे रुपयाच्या किमतीत कमकुवतता आला आहे. ज्यामुळे आयातीवरदेखील परिणाम झाला आहे. तसेच पेट्रोल – डिझेलसह सगळ्याच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असेल तर, आपल्यासाठी अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. विमा कंपन्या अनेक प्रकारच्या योजना ऑफर करून सामान्य नागरिकांना गोंधळात पाडतात. त्यासाठीच विमा नियंत्रक यंत्रणा म्हणजेच (IRDAI)ने सगळ्या विमा कंपन्यांना एक लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचा स्टँडर्ड इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/