सांगली : ग्रामसभेत राडा, 25 जणांविरुद्ध FIR

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – मिरज तालुक्यातील बोलवाड ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुरू असताना तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीवरून बुधवारी जोरदार राडा झाला होता. सरपंच गट व विरोधी गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात रायाप्पा उर्फ पिंटू नाईक व शरद धोंडीराम नाईक यांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल केल्या असून यामध्ये २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोलवाडच्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुहास पाटील व सचिन कांबळे यांच्यात वाद झाला होता. सुहास पाटील यांच्या सांगण्यावरून त्यांच्या समर्थकांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्यांनी तसेच चाकूने करून गंभीर जखमी केले म्हणून फिर्याद दिली आहे. तर सरपंच सुहास पाटील यांना मारहाण करण्यासाठी जात असताना आण्णाप्पा नाईक, नितीन पाटोळे व रफिक शेख हे अडवत असताना त्यांना चाकूने वार करून गंभीर जखमी केली म्हणून फिर्याद दिली आहे. दोन्ही गटाकडून दिलेल्या फिर्यादीवरून २५ जणांविरोधात मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –