रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

हरयाणातील गुरुग्राम येथे गृहसंकूल व व्यापारी संकुले उभारण्यासाठी केलेल्या जमीन खरेदीतील कथित अनियमततेविरोधात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रॉबर्ट वड्रा यांच्यासह हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुड्डा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7133ba09-ae97-11e8-86c3-6d9fa4fcd571′]

या प्रकरणी रॉबर्ट वड्रा यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या ४२० कलमासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. या एफआयआरमध्ये दोन रियल इस्टेट कंपन्यांचीही नावे आहे.

या व्यवहारात वड्रा यांनी ५० कोटींचा लाभ उठविल्याचा आरोप आहे. स्वस्त दरात जमीन खरेदी करून सरकारच्या मदतीने जास्त दरात विकण्याचा आरोप वड्राच्या स्कायलाईट कंपनीवर करण्यात आला होता. भूपेंद्र सिंह हुड्डा मुख्यमंत्री असताना हे प्रकरण गाजले होते. या प्रकरणामध्ये रॉबर्ड वड्रा यांच्या नावावरून विरोधी पक्ष काँग्रेसला निशाण्यावर घेत होते.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’774a6968-ae97-11e8-9845-03cf96f0d287′]

हरयाणातील भाजप सरकारने यापूर्वीच या जमीनखरेदी व्यवहाराची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना केली आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा केला होता. वड्रा, हुड्डा या दोघांसह स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी आणि डीएलएफ या कंपन्यांच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेचे कलम ४२०, १२० ब, ४७६, ४६८ आणि ४७१ अन्वये वड्रा यांच्याविरुद्ध केस दाखल करण्यात आली आहे.

उदयनराजेंकडून बापट यांना साताऱ्यातून खासदारकीची ऑफर