FIR on Hospitals | सरकारकडून 2 कोटी ‘गिळंकृत’ केल्यानंतर देखील रूग्णांना लुटणार्‍या 2 हॉस्पीटलवर FIR

मनमाड : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात खासगी रुग्णालयां (Hospitals) कडून होणाऱ्या लुटीचे प्रकार सुरूच आहे. राज्य सरकारने दर ठरवून दिले असले तरी काही खासगी रुग्णालये (Hospitals) अवाच्या सव्वा दर आकारत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. मालेगावमधील मनमानी करणाऱ्या दोन रुग्णलयांवर कारवाई करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला होता.

त्या रुग्णालयावर सिक्स सिग्मा आणि सनराईज रुग्णालयां ((Hospitals) ) वर कारवाई करत महापालिकेने अखेर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, मनपाच्या आरोग्य अधिकारी सपना ठाकरे यांचाही पदभार काढून घेतला.
त्यानंतर पोलीस ठाण्यात या दोन रुग्णालयांच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तर शहरातील ३२ रुग्णालयांनादेखील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी सिक्स सिग्मा रुग्णालयाकडून मनमानी पद्धतीने रुग्णांकडून बिल वसूल केली जात असल्याची तक्रार कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर या रुग्णालयाची झाडाझडती घेण्यात आली त्यावेळी हे रुग्णालय जीवनदायी योजनेत असल्याचे समोर आले. रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णावर उपचार केल्याचे दाखवून शासनाकडून २ कोटी रुपये तर घेतलेच शिवाय रुग्णाकडून देखील बिल वसूल केल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे भुसे यांनी महापालिका प्रशासन आणि पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तपासा सुरु असलेली दिरंगाई पाहता भुसे यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्याच्या कृषिमंत्र्यांनीच थेट इशारा दिल्यामुळे अखेर, पालिका प्रशासनाला नरमाईची भूमिका घ्यावी लागली.

हे देखील वाचा

Pimpri Crime News : बनावट पॅन कार्ड, आधारकार्ड बनवून तरुणाच्या नावावर 8 फायनान्स कंपन्यांमधून घेतले कर्ज; 8 लाखाची फसवणूक

फायद्याची गोष्ट ! पीपीएफ अकाऊंटमध्ये 10 वर्षाच्या मुलांच्या नावाने दरमहा 500 रूपये जमा करून 28 लाख मिळवण्याची संधी, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Title : fir on 2 hospitals in malegaon nashik