उरणच्या ओएनजीसीच्या (ONGC) गॅस प्लँटला भीषण आग

उरण : पोलीसनामा ऑनलाइन – उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्लॅंटला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली आहे. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून दोन तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. या आगीत ३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग प्रकल्पातील एका युनिटला भीषण आग लागली आहे. या आगीची तीव्रता इतकी आहे की, प्रकल्पासभोवतालच्या दोन गावातील लोकांना सुरक्षेच्या दृष्टीने दूर हलविण्यात आले आहे. तसेच अनेक नागरिक भितीने स्वत: हून गाव सोडून जाताना दिसत आहे.

ही आग विझविण्यासाठी जेएनपीटी तसेच ओएनजीसीचे बंब प्रयत्नांची शिकस्त करीत असून परिसरातील अनेक कंपन्यांच्या अग्निशामक दलाच्या गाड्या मागविण्यात आल्या आहेत.

या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका मोठ्या स्फोटाचा आवाज आला आणि आगीचा भडका उडाला असे गावकरी सांगत आहेत. या आगीची तीव्रता इतकी प्रचंड आहे की, काही किलोमीटरवरुन या आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसून येत आहे. उरण येथील समुद्राच्या एका बाजूला हा प्रकल्प आहे.

आरोग्यविषयक वृत्त –