भीषण आगीत प्लायवुडचे गोदाम जळून खाक 

ADV

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन- काळेवाडी, विजयनगर येथील एका प्लायवुडच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे प्लायवूड जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 17) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी मधील विजयनगर किनारा कॉलनी येथे दिनेश मोटवानी यांचे प्लायवूडचे गोदाम आहे. या गोदामाच्या बाजूला असलेल्या दोन खोल्यांमध्ये असलेल्या कडब्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग पसरून शेजारच्या गोदामातील प्लायवुडने पेट घेतला.

घटनेची माहिती मिळताच रहाटणी, तळवडे, वल्लभनगर, पिंपरी, इत्यादी पाच केंद्राचे बंब तसेच टाटा मोटर्स आणि बजाज ऑटो कंपनीच्या फायर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. ही आग इतकी प्रचंड होती की, या आगीमध्ये गोदामातील प्लायवुड जळून लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

भय्यू महाराज मृत्यू प्रकरण : अश्लिल व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्याऱ्या तरुणीसह दोघांना अटक