उरण ओएनजीसी प्लांटला भीषण आग, 5 जणांचा मृत्यू 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला आज सकाळी भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग लिक्विड गळतीमुळे लागली आहे.

नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त (सीपी) अशोक दुधे यांनी दिलेल्या माहितीनुसार ओएनजीसी गॅस प्लांटला आज सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली, तेल व नैसर्गिक वायू महामंडळाचे (ओएनजीसी) अधिकारी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे 5 सुरक्षा रक्षक मरण पावले आहेत. तसेच  3 लोक जखमी झाले आहेत मात्र ते धोक्याबाहेर आहेत.

या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.आगीची माहिती मिळताच, ओएनजीसी, जेएनपीटी फायर ब्रिगेड, तसेच द्रोणागिरी, पनवेल आणि नेरुळ नेरूळ इथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या होत्या. गेल्याच महिन्यात या प्लाटमध्ये स्फोट होऊन आग लागली होती हा प्लांट जुना झाला असून धोकादायक बनला आहे.

https://www.facebook.com/policenama/videos/704017966731257/

आरोग्यविषयक वृत्त –