नागपूरमधील दवा बाजार संकुलात भीषण आगीत दुकाने जळून खाक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूरातील गंजीपेठ येथे असलेल्या संदेश दवा बाजार संकुलात शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास लागलेल्या आगीत दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या ११ गाड्यांनी आग आटोक्यात आणली असून या घटनेत जिवीत हानी झाली नाही परंतु लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे.

नागपूरच्या गंजीपेठ भागात संदेश दवा बाजार आहे. या इमारतीमध्ये होलसेल औषध विक्रीची दुकाने आणि गोदामे आहेत. शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास या चार मजली इमारतीत आग लागली. याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

११ गाड्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र या घटनेत लाखोंची औषधी जळून खाक झाली आहे. तर कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

You might also like