बीडमध्ये ६ दुकानांना भीषण आग, ३ लाखांची रोकड जळाली

बीड: पोलीसनामा ऑनलाईन- बीड शहरातील मासूम कॉलनी परिसरात ६ दुकानांमध्ये भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.. आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत  तीन लाखांची रोकड जळून खाक झाली.

शहरातील मासूम कॉलनी परिसरातील दुकानांना आज पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत शहेबाज शेख यांचे न्यू फर्निचर, शहा आलम खान यांचे एम. के. फर्निचर, शेख अखिल अहमद व शेख इब्राहिम यांचे सुरभी डोअर, शेख जुनेद शेख, इलियास पटेल यांचे यादगार फर्निचर, सज्जाद खान व अन्सारी मन्सूर यांचे ग्लास कुलर वर्क, तर शहबाज खान तय्यब खान एस. एस. वर्कशॉप बॉम्बे या दुकानांना आग लागली. या आगीत दुकानातील ३ लाख रुपयांची रोकड जळाली. तसेच दुकानांमधील साहित्य जळून दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाले आहे. आगीत नुकसान झाल्याने व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली.

20 हजाराची लाच घेताना आरोग्य पर्यवेक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like