Corona Virus : फोफावणार्‍या ‘कोरोना’ला थांबवण्यासाठी डेव्हलप झालं आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) सिस्टम Firetinas

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये पसरलेल्या महामारी कोरोनानंतर आता जगभरात अलर्ट देण्यात आला आहे. चीनच्या सीमेवर असलेल्या अनेक देशात कोरोना पसरत आहे. चीनमध्येच कोरोनाने 2 हजार पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला. 20 हजार पेक्षा जास्त लोक या व्हायरसमुळे प्रभावित झाले. भारतात कोरोना व्हायरसची 4 प्रकरणं समोर आली आहे. दिल्ली, तेलंगणा, केरळ अशा राज्यात कोरोनाची प्रकरणं समोर आली आहेत. हा व्हायरस रोखण्यासाठी जगभरातील देशांमध्ये रिसर्च सुरु आहे जेणेकरुन या महामारीला रोखता येईल.

एका अहवालानुसार, केंब्रिज आणि मॅंचेस्टर यूनिवर्सिटीच्या रिसर्चने कोरोना व्हायरस डिटेक्ट करणारा आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिस्टम (फायरटिनेस) Firetinas तयार केली आहे. याच्या मदतीने लोकांच्या शरीराच्या तापमानावरुन कळेल की रुग्ण व्हायरसने बाधित आहे की नाही. उच्च शरीर तापमान हे कोरोनाचे लक्षण मानले जाते. सामान्य ताप आणि कोरोनाचा ताप असलेल्या रुग्णांमध्ये फरक करणे अवघड असते. संशोधकांचा दावा आहे की या नव्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिस्टमने व्हायरसने बाधित रुग्ण ओळखता येतील.

सध्या हे आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिस्टम चिनी शाळा, रुग्णालयात लावण्यात आली आहे जेणेकरून या व्हायरसने बाधितांची ओळख करता येईल. कोरोना एक जीवघेणा आजार आहे. फायरटिनेसमध्ये एक हाय परफॉर्मंस इंटिग्रेडेट सर्किट (आयसी) लावण्यात आले आहे. जे प्रति सेकेंदाला 3 ट्रिलियन एनपीयू कॅल्यूलेट करु शकते. हे 1,000 स्वेअर फूट क्षेत्रात 100 लोकांची तपासणी करु शकते. हे सिस्टम तयार करणाऱ्यांचे म्हणणे आहे की फायरटिनेसला फेस रिकॉग्निशन सिस्टमसोबत इंटिग्रेट केले जाऊ शकते.

हे तयार करण्यासाठी अल्गोरिदमचा वापर केला गेला आहे, जे 99 टक्के अचूकतेने या व्हायरसने प्रभावित लोकांना डिटेक्ट करु शकते. फायरटिनेस प्रत्येक ऑन-इन-वन सिस्टम कॅमेरात इंटिग्रेट केले जाऊ शकते. यात टेम्परेचर सेंसर, मायक्रो कम्प्युटर, न्यूरल नेटवर्क सिस्टम आणि दोन ब्लॅक बॉडीज दिले गेले आहेत. हे सेट करणं आणि ऑपरेट करणं बरेच सोपे आहे.