देव तारी त्याला कोण मारी ! बंदुकीतील गोळीनं बुलेटप्रुफ जॅकेट केलं ‘आरपार’, पण…

फिरोजाबाद : वृत्तसंस्था – नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात उत्तर प्रदेशातील अनेक शहरांत उग्र आंदोलने सुरू आहेत. यावेळी फिरोजाबादमधून एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. नागरिकत्व कायद्याविराधोत शुक्रवारी हिंसक आंदोलन सुरू असताना बुलेटप्रुफ जॅकेट घातलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला गोळी लागली. परंतु, पाकिटातील नाण्यांमुळे या कर्मचाऱ्याचे प्राण वाचले. माहितीनुसार, हिंसक आंदोलनात कॉन्स्टेबल विजेंद्र कुमार आपल्या पथकासह सुरक्षेसाठी तैनात होते. याच वेळी एक गोळी त्यांचे बुलेटप्रुफ जॅकेट भेदून पर्समध्ये अडकली. यामुळे ते बचावले.

आंदोलन सुरू असल्याने विजेंद्र कुमार यांनी त्यांची मनीपर्स शर्टच्या खिशात ठेवली होती. याच वेळी एक गोळी बुलेटप्रुफ जॅकेट भेदून पर्समध्ये जाऊन अडकली. यातील नाण्यांमुळे ही गोळी पुढे जाऊ शकली नाही. जर पर्समध्ये सुट्टी नाणी नसती तर ते जागीच गतप्राण झाले असते. यावर विजेंद्र कुमार यांनी म्हटले, असे वाटते की हा माझा दुसरा जन्म आहे.

फिरोजाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या उग्र आंदोलनात पोलिसांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच जाळपोळीचे प्रकारही घडले. निदर्शने करत असलेल्या लोकांनी गोळीबारही केला. यावेळी एका पोलीस चौकीलाही आग लावण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिरोजाबादमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर लहान-लहान गटांनी रस्त्यावर उतलेल्या लोकांनी नालबंद पोलीस चौकी जाळली. या चौकीच्या समोर उभी असलेली वाहनेही जमावाने जाळली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/