‘या’ महिलेच्या धाडसाला ‘सलाम’, बिल्ला नंबर – 13 बनली ओळख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिम्मत आणि धाडसाच्या अनेक कथा आपण पाहिल्या आणि ऐकल्या असतील, पण भोपाळमध्ये राहणाऱ्या लक्ष्मीची कथा ही अशीच एक संघर्षाची कहाणी आहे जी सध्या अनेकांना प्रेरणा देत आहे. आम्ही बोलत आहोत भोपाळची पहिली महिला कुली लक्ष्मी हिच्याबद्दल जिने आपल्या कुटूंबाच्या देखभालीसाठी आणि मुलांच्या सुवर्ण भविष्यासाठी इतरांचा ओझे वाहून वाहण्याचा म्हणजेच हमालीचा व्यवसाय निवडला जे काम सामान्यत: पुरुष करत असतात.

लक्ष्मीचे लग्न भोपाळ रेल्वे स्थानकात कार्यरत हमाल राकेश याच्याशी झाले होते. नवऱ्याच्या मृत्यूनंतर लक्ष्मीला रेल्वे अधिकाऱ्यांनी नियमांनुसार हमालाची नोकरी दिली. तेथे तिची ओळख बनला बॅज क्रमांक १३. हाच बॅज नंबर १३ घालून लक्ष्मी भोपाळ रेल्वे स्थानकात रोज रात्रीची शिफ्ट करते.

हमालीचे काम करून मिळणाऱ्या उत्पन्नावर लक्ष्मी तिचे घर आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च निघतो. तथापि, लक्ष्मीचा असा समज आहे की ती आपल्या मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी पुरेसे पैसे कमवत नाही. आजकाल सरकारी शाळेत चांगले शिक्षण सुरू झाले आहे असे म्हणत मुलाचे भविष्य उज्ज्वल आहे असा विश्वास ती व्यक्त करते.

रात्री करते काम :
दरम्यान, लक्ष्मी रोज रात्री शिफ्टमध्ये काम करते आणि दिवसा घरातील महत्वाच्या कामे पूर्ण करते. लक्ष्मी रोज जवळपास ६ तास काम करते. साधारणत: लक्ष्मी आपली ड्युटी सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू करते पण कधी कधी रात्री उशिरापर्यंत ड्युटी करावी लागते कारण राजधानी आणि प्रीमियम गाड्यांच्या प्रवाशांकडून रात्री चांगले उत्पन्न मिळते.

लक्ष्मीने सांगितले की ती आजारी असतानाही कामावर येते, पण त्यावेळी याची काळजी घेते की कमी काम करून ती लवकर घरी जाऊ शकेल जेणेकरून आरोग्यावर फारसा परिणाम होणार नाही कारण दररोज पैसे मिळवण्यासाठी निरोगी असणे आवश्यक आहे.

लक्ष्मीच्या मते, ती सर्वसाधारणपणे दिवसाला ३०० ते ४०० रुपये मिळवते, परंतु असे बऱ्याच वेळा होते जेव्हा तिची कमाई १००-२०० इतकीच होते. त्याच बरोबर, महिला हमाल म्हणून काम करत असल्याचे पाहून लोक प्रभावित होतात. लक्ष्मीने सांगितले की बर्‍याच वेळा लोक तिच्या मदतीचा प्रयत्न करतात पण ती त्यांना नकार देते. तथापि, बऱ्याच वेळा लोक तिला तिचे पैसे देण्याबरोबरच बक्षीस म्हणून जास्त पैसे देतात, ज्यामुळे लक्ष्मीला मदत होते.

Visit : policenama.com