चांद्रयान – 2 : ‘IIRS’ ने घेतले ‘चंद्राच्या’ पृष्ठभागाचे ‘फोटो’, ISRO ने केले ‘शेअर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गुरुवारी चंद्राचे फोटो काढले. हे फोटो चांद्रयान 2 च्या IIRS (इमेजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर) ने घेतले आहेत. IIRS ला याप्रकारे डिझाइन करण्यात आले आहे ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावरुन परिवर्तित होणारे सूर्याच्या प्रकाशांना मापू शकेल.

इसरोकडून सांगण्यात आले की IIRS ला चंद्रवर सूर्याच्या परिवर्तित किरणांचा, चंद्राच्या पृष्ठभागावरील खनिजांचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे फोटो समोर आल्यानंतर काही महत्वाच्या बाबी समोर आल्या.

याआधी 4 ऑक्टोबरला इसरोकडून चंद्रायान – 2 च्या ऑर्बिटर हाय रिजोल्यूशन कॅमेऱ्यातून फोटो घेण्यात आले होते. या हाय रिजोल्यूशन कॅमेराने चंद्राच्या पृष्ठभागावरील फोटो घेतले होते. या फोटोमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर छोटे मोठे खड्डे दिसून आले.

इसरोने ऑर्बिटर हाय रिजोल्यूशन कॅमेऱ्याने घेण्यात आलेले फोटो जारी केले होते. या कॅमेऱ्यांने चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रायान – 2 चे हाय रिजोल्यूशन फोटो टाकण्यात आले आहेत. हे पॅक्रोमॅटिक बँड (450 – 800 एनएम) वर संचालित होतात.

चंद्रयान 2 अयशस्वी नाही
इसरोने स्पष्ट केले की सुरुवातीला आलेल्या आकड्यांनुसार आपल्या मिशनमध्ये फक्त 2 टक्क्यांची कमी होती, 98 टक्के मिशन यशस्वी होते. या आधारे इसरो अध्यक्ष के सीवन यांनी लोकांना हे सांगितले होते.

तेव्हा इसरोच्या अध्यक्षांनी सांगितले होते की एनआरसीच्या पूर्ण तपासणीनंतर आता आपण आपल्या ऑर्बिटरला मिळालेला सर्व डाटा आणि फोटोंना सामान्य जनतेसमोर ठेवणार आहेत. रिव्यू कमेटी एनआरसी आता देखील चंद्रायान – 2 च्या विक्रम लँडरच्या माहिती आकड्यांच्या आणि फोटोंच्या आधारे मिळण्याचे काम करत आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी