‘मच्छिमार’ पकडत होता मासे, हाती लागला 3 पायांचा ‘एलिअन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मच्छिमार समुद्रात मासे पकडण्यासाठी गेला होता. त्याने काटा फेकला आणि थोड्या वेळाने काट्यामधील तार जोरजोरात हलू लागला. त्यामुळे मच्छिमाराने तार ओढण्यास सुरुवात केली. त्याला वाटले की मोठा मासा जाळ्यात अडकला असेल. परंतु जेव्हा पूर्ण तार बाहेर आला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याने आजपर्यंत असा आगळा वेगळा जीव बघितला नव्हता. याचा कुणीतरी व्हिडीओ काढला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

अजून तरी याचा तपास नाही लागला की हा जीव कुठून आणि कोणी समुद्रातून बाहेर काढला आहे. परंतु सोशल मीडियावर सध्या या जीव चा व्हिडीओ व्हायरल होत असून यास लोक बघत आहेत. एलिअन सारखा दिसणारा जीव हा सुरुवातीला ऑक्टोपस सारखा दिसत असला तरी याची सोंड ही ऑक्टोपस सारखी नाही.

एलिअन सारख्या दिसणाऱ्या या जीवास तीन पाय देखील आहेत. हा जीव आपल्या तोंडाला देखील पसरवतो तसेच याला दोन मोठे मोठे डोळे आहेत जे की बॉलीवूड मध्ये दाखवण्यात आलेल्या जादू या एलिअन सारखी आहेत. तसेच याच्या सोंडेवर छोटे छोटे टेंटिकल्स आहेत आणि तसेच या जीवास गिल देखील आहेत.

मच्छीमार सोबत ज्या कुणीही त्या जीवास पाहिले त्याला वाटले की हा सी – स्क्विड (Sea Squid) असेल. असेही म्हटले जात होते की हा एक सी – स्किवरल (Sea Squirrel) आहे. परंतु या जीवाचे नेमके नाव कोणालाही माहिती नव्हते. परंतु जेव्हा हा जीव ओशन कन्झर्वेशन ट्रस्टच्या वैज्ञानिकांना दाखविण्यात आला तेव्हा असे आढळले की ते एलास्मोब्रँच (Elasmobranch) प्रजातींच्या जीवांना मिळताजुळता आहे.

एलास्मोब्रँच जीवांमध्ये काही शार्क, रे आणि स्केट्स सारखे मासे मोडतात. या माशांमध्ये हाडे कमी आणि कार्टिलेज जास्त असतात. ओशन कन्झर्वेशन ट्रस्टचे मरीन एक्सपर्ट मार्कस विलियम्स यांनी सांगितले की आम्ही आजपर्यंत असा कोणताच जीव बघितला नाही. हे होऊ शकते की क्लियरनोस स्केट्स (Clearnose Skate) सारखा मिळता जुळता जीव आहे.

ओशन कन्झर्वेशन ट्रस्टचे मरीन एक्सपर्ट मार्कस विलियम्स म्हणाले की, त्याला दोन लहान फिन्स देखील आहेत तसेच दोन पंख आहेत. एक लांब सोंड आहे. त्याला तीन पाय देखील आहेत. जेव्हा तो धोक्यात असतो तेव्हा तो एलिअन सारखा गोल होतो. म्हणजेच, तो त्याच्या दोन मोठ्या पंखांनी स्वत:ला झाकून घेतो.