पुण्यातील सेल्समनला लुटणारी 5 जणांची टोळी जेरबंद

अहमदनगर :  पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील सेल्समनला लिफ्टच्या बहाण्याने लुटणारी 5 जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून कारसह पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, दि. २०/०२/२०१९ रोजी शिवशंकर भिमराव शेवणे (वय- ३६ वर्षे, धंदा-सेल्समन, रा. ग्रीन सिटी, हंडेवाडी
रोड, हडपसर, पुणे) हे स्वास्तिक चौकातील बसस्थानक येथे पुणे येथे जाणेसाठी बसची वाट पहात थांबलेले होते. एका स्विफ्ट कार चालकाने त्यांना पुणे येथे जायचे आहे, असे सांगून कारमध्ये बसविले. तक्रारदार हे सदर कारमध्ये बसल्यानंतर कारचालकाने पुणे रोडने पुढे जात असताना आणखी तीन प्रवाशी साथीदार सोबत घेतले. अहमदनगर ते सुपा प्रवासादरम्यान तक्रारदार यांना मारहाण करुन व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या  जवळी रोख १,८००/-रु. व एक सॅमसंग कंपणीचा मोबाईल व बँकेचे एटीएम कार्ड असा एकूण १२,४००/-रु. किं. चा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला होता. त्यानंतर फिर्यादीकडून एटीएमचे पासवर्ड घेवून एटीएम मधून १,००,०००/-रु. काढून घेतले. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दि. २१/०२/२०१९ रोजी कोतवाली पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहीती मिळाली कि, सदरचा गुन्हा मनोज गायकवाड, रा. उमापूर, ता. गेवराई, जि.बीड याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची माहीती मिळाल्याने व तो व त्याचे साथीदार हे एका सफेद रंगाची स्विफ्ट कार नं. एमएच-११-७०७१ हीमधून नगर पाथर्डी रोडने अहमदनगर शहराचे दिशेने येत आहेत.

आता भिंगार परिसरात सापळा लावल्यास मिळून येतील, अशी खात्रीशीर माहीती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/सचिन खामगळ, पोहेकॉ/मनोज गोसावी, दत्तात्रय हिंगडे, योगश गोसावी, रविन्द्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, आण्णा पवार, संतोष लोंढे, विनोद मासाळकर, मच्छिन्द्र बर्ड, दिपक शिंदे, रवि सोनटक्के, विजय ठोंबरे, मेघराज कोल्हे, चालक बबन बेरड अशांनी मिळून भिंगार परिसरात सापळा लावून मिळालेल्या बामतीनूसार सफेद रंगाची स्विफ्ट कार नं. एमएच-१७-बीडी- ७०७१ ही ताब्यात घेतली.

सदर कारमधील पाच इसमांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे, पत्ते १) मनोज एकनाथ गायकवाड, वय- २४ वर्षे, रा. उमापूर, ता- गेवराई, जि. बीड, २) निसार मंजूर शेख, २० वर्षे, रा. उमापूर, ता-गेवराई, ३) सोमेश्वर तुकाराम म्हस्के, वय- २८ वर्षे, रा, उमापूर, ता. गेवराई, ४) रघूनाथ गोविंद कळकेकर, वय- २५ वर्षे, रा. धर्मापुरी, ता. कंदार, जि- नांदेड, ५) मोहम्मद मंजूर शेख, वय- २२ वर्षे, रा. उमापूर,ता- गेवराई, जि. बीड असे असल्याचे सांगीतले.

त्यांना विश्वासात घेवून गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्या करण्यासाठी वापरलेली २,५०,०००/-रु. किं. ची स्विफ्ट कार, २१,७००/-रु. रोख रक्कम, १०,०००/-रु. किं. चा मोबाईल असा एकूण २,८१,७००/-रु. किं. चा
मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपींना मुद्देमालासह कोतवाली पो.स्टे. येथे हजर करण्यात आले अाहे. पुढील कार्यवाही कोतवाली पो.स्टे. हे करीत आहेत.