‘फ्लिपकार्ट’च ‘क्रेडिट’ कार्ड लवकरच ‘लाँच’, ग्राहकांना मिळणार ‘कॅशबॅक’ वर ‘कॅशबॅक’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट, एक्सिस बँक आणि मास्टरकार्ड यांच्या बरोबर आपले क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याची तयारी करत आहे. फिल्पकार्टच्या नव्या क्रेडिट कार्डमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन शॉपिंगवर ५ टक्के कॅशबँक पासून अनलिमिडेट कॅशबँक मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांना इतर सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत. जुलै महिन्यात काही ग्राहकांना ही सुविधा मिळणार आहे तसेच येणाऱ्या काळात इतर ग्राहकांना देखील याचा लाभ घेतात येणार आहे.

५०० रुपयात मिळणार क्रेडिट कार्ड –
फिल्पकार्डने दिलेल्या माहिती नुसार, ग्राहकांना यासाठी नोंदणी शुल्क असणार असून ५०० रुपये भरावे लागणार आहे. वर्षाला २ लाख रुपयांच्या खरेदीवर यावर लागणारे वार्षिक शुल्क माफ करण्यात येईल. तर प्रत्येक महिन्याला ग्राहकांना स्टेटमेंटमध्ये कॅशबॅक ऑटो क्रेडिट करण्यात येईल.

फिल्पकार्ट – एक्सिस बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कंपनीच्या को – ब्रांड मर्चेंट फ्लिपकार्ड, मिंत्रा आणि 2GUD कडून सामान खरेदी केले तर ग्राहकांना ५ टक्के कॅशबॅक मिळेल.

फ्लिपकार्ट आणि एक्सिस बँकने थर्ड पार्टी मर्चेट बरोबर करार केला आहे. ज्यात मेक माय ट्रिप, उबर, पीव्हीआर, अर्बन क्लॅप आणि क्योर फिट यांचा समावेश आहे. या मर्चंट कडून सामान खरेदी केल्यास ग्राहकांना ४ टक्के कॅशबँक मिळणार आहे. तर इतर सर्व मर्चंट कडून खरेदी केल्यास १.५ टक्क्यांची अनलिमिटेड कॅशबॅक मिळणार आहे.

३००० रुपये वेलकम बेनिफिट –
या कार्डमध्ये वेलकम बेनिफिटच्या अंतर्गत ग्राहकांना को – ब्रांडेड मर्चंटस आणि थर्ड पार्टी प्लेटफॉर्म वरुन खरेदी केल्यास ३००० रुपये मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांला देशभरातील रेस्टॉरटमध्ये २० टक्कांपर्यंत सूट मिळणार आहे आणिर १.५ टक्के कॅशबँक देखील मिळणार आहे. ऐवढेच नाही तर ग्राहकांना दर महिन्याला पेट्रोलच्या सरचार्जवर १ टक्के किंवा ५०० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या