पिंपरी-चिंचवड शहरात पूरसदृश परिस्थिती, शहरातील वाहतुकीत बदल

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरात कोसळत असलेल्या पावसामुळे आणि पवना, मुळशी धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे शहरातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले असून या भागात वाहतूकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेने शहरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. तर काही रस्त्यांवरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे.

नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आणि सतत पडत असलेल्या पावसामुळे सांगवी-औंध भागातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याने हे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी या मार्गाचा वापर करू नये असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले मार्ग

– जुनी सांगवी ते स्पायरस कॉलेज जवळील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

– सांगवी येथील सावित्रीबाई फुले गार्डन, कस्पटे चौक, वाकड नाका वाहतुकीसाठी बंद

– काळेवाडी चौकातून मानकर चौकाकडे जाणाऱ्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

– चाफेकर चौक ते मोरया गोसावी मंदीर आणि धनेश्वर मंदिर ते स्मशानभूमिकडे जाणारा रस्ता बंद

– कुदळवाडी ते मोई हा पूल वाहतुकीसाठी बंद

– शेलपिंपळागाव येथे रस्त्यावर पाणी आल्याने काही भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

– शिक्रापूर ते चाकण मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

– देहूरोडकडून मामुर्डी, सांगवीकडे जाणाऱ्या लोखंडी पुलावरपाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त