मुलाकडं आढळला उडणारा साप, पोलिस देखील झाले ‘हैराण-परेशान’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन – उडीसा राज्याच्या भूवनेश्वर या शहरामधून पोलिसांनी एका मुलाकडून असा साप जप्त केला आहे. जो की अक्षरशः उडतो. उडणारा साप सर्वांना दाखवून तो त्याची उपजीविका भागवत होता. त्याचं झालं असं कि, तो मुलगा तो साप लोकांना दाखवत असताना कोण्या एका व्यक्तीने त्याबाबत पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यासंदर्भात चौकशी सुरु केली. पोलिसांनी वन विभागाचा अधिकाऱ्यांना सुद्धा हि माहिती कळवली.

यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तो साप मुलाकडून जप्त केला. शहराच्या एका वन प्रभाग प्रभारी यांनी असे सांगितले की, असं करणं वन्यजीव संरक्षण अधिनिमानुसार गुन्हा आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे कि, हा साप कधी आणि कसा मिळाला.

तसेच वन विभागाकडून असे सांगितले गेले की, या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सापाला जंगलामध्ये सोडून दिले जाईल. पोलीस मुलाची चौकशी करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त