केवळ पाण्यानं मिळेल मनासारखं ‘सौंदर्य’ अन् दूर होतील ‘काळे’ डाग, फक्त ‘या’ 5 वस्तूंचा वापर करा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : केवळ पाण्याने मिळेल मनासारखे सौंदर्य आणि दूर होतील डाग, फक्त ‘या’ 5 वस्तूंचा करा वापर :

चेहर्‍यावरील डागांनी त्रस्त झालेल्या मुली नेहमी घरगुती उपायांचा आधार घेत असतात. तर काही लोक महागड्या प्रॉडक्टचा वापर सुद्धा करतात. परंतु, हे सर्व उपाय सुद्धा फेल होतात. जर चेहर्‍यावर मनासारखी चमक हवी असेल तर पाण्याचा वापर करा. यासाठी पाण्यात काही वस्तू मिसळून प्या. यामुळे शरीर डिटॉक्स होईल आणि आतील घाण सहज बाहेर काढली जाईल.

चिया सीड :

चिया सीड हे तुळशीच्या प्रजातीचे बी असते. चियाच्या बीमध्ये अल्फा लिपोईक अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणात असते, जे एक जबरदस्त अँटीऑक्सीडन्ट असते. हे त्वचेच्या सुरकुत्या दूर करण्यासाठी मदत करते. याशिवाय चिया सीड्समध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड असते जे निस्तेज त्वचेला चमकदार, निरोगी बनवते.

पुदीना :

पुदीन्याच्या पाण्याने पोट साफ राहाते. यामुळे चेहर्‍याची चमक वाढते. याच्या सेवनाने त्वचा तजेलदार होते. तसेच पोटातील उष्णता दूर होते. चमकदार त्वचा पाहिजे असेल तर पुदीना पिणे सुरू करा.

दालचिनी :

पिण्याचे पाणी उकळवा. उकळत्या पाण्यात चिमुटभर दालचिनी पावडर आणि सफरचंदाचे काही तुकडे टाका. नंतर पाणी गाळून प्या. हे पिण्यास चविष्ठ सुद्धा असते. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. चेहर्‍याचे तेज वाढते.

लिंबू, अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर :

पिण्याच्या पाण्यात लिंबूरस टाकून प्यायल्याने अनेक फायदे होतात. लक्षात ठेवा पाण्यात लिंबूचे काही थेंबच टाका. यामुळे पचनक्रिया सुधारते, शरीरातील घाण, घाम व अन्य मार्गाने बाहेर येते. लिंबूऐवजी तुम्ही एक ग्लास पाण्यात एक चमचा अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरसुद्धा मिसळून पिऊ शकता.