भुईमुगाच्या शेंगामध्ये लपवलं होतं 45 लाखाचं ‘परदेशी’ चलन, विमानतळावरील सुरक्षा अधिकारी देखील ‘हैराण-परेशान’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने विदेशी चलनाच्या तस्करीचा पर्दाफाश केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या समानाचा तपास केला. त्यानंतर सुरक्षा कर्मचारी देखील हैराण झाले की परकीय नोटांची छोट्या आकारात घड्या घालून त्या नोटा भुईमुगाच्या शेंगांच्या टरफलात ठेवण्यात आल्या होत्या. एवढेच नाही तर आरोपी बिस्किट आणि मिठाईच्या आत परदेशी चलन लपवून घेऊन जात होता.

शेंगांच्या आत 45 लाख –
चक्रावून टाकणाऱ्या या घटनेचा हा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात स्पष्ट दिसत आहे. सीआयएसएफचे अधिकारी शेंगा आणि बिस्किटातून परकीय चलन काढत आहेत.

घटना मंगळवारची आहे, जेव्हा नवी दिल्ली स्थित इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर एक व्यक्ती खाद्यापदार्थांच्या सामनासह पोहचला होता. एअरपोर्टवर उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्याला एका व्यक्तीवर संशय आला आणि चौकशीसाठी आपल्यासोबत नेले.

बिस्किट मिठाईमध्ये लपवल्या होत्या नोटा –
सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्या आरोपीच्या सामनाचा तपास केला आणि तो चकरावून गेला. युवकाकडे 45 लाख रुपये परकीय चलन जप्त करण्यात आले. त्याने शेंगा, बिस्किटं, मिठाई यात या नोटा लपवल्या होत्या. चौकशीत उघड झाले की आरोपीने हे सर्व सामान दुबईहून आणले होते. या आरोपीचे नाव मुराद आलम असल्याचे सांगितले जात आहे. सर्व आवश्यक चौकशी केल्यानंतर सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी त्याला कस्टम विभागाकडे सोपवले.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल –
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परकीय चलनाच्या नोटा बिस्किट, शेंगा यांत लपवण्यात आल्या होत्या. आरोपी मुराद आलमने या परकीय चलनाच्या छोट्या छोट्या घड्या घालून ते शेंगामध्ये लपवले होते. तर बिस्किटात बोळ करुन नोटांचे बंडल लपवले होते. असे असले तरी हा काही पहिला प्रकार नाही. अशा चक्रावून सोडणाऱ्या अनेक घटना विमानतळावर घडत असतात. परंतु ही घटना पाहून लोक थक्क झाले.