
Former CM Manohar Joshi | माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली, हिंदुजा रुग्णालयात दाखल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Former CM Manohar Joshi) यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये (Hinduja Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या (Former CM Manohar Joshi) प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) हे पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यासह रुग्णालयात पोहोचले आहेत. मनोहर जोशी यांचे वय 86 इतकं आहे.
मनोहर जोशी (Former CM Manohar Joshi) यांची शिवसेनेतून (Shivsena) राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला. मुंबईचे महापौरपदही (Mumbai Mayor) त्यांनी 1976 ते 1977 या काळात भुषवले होते. तर शिवसेना भाजप युतीच्या (Shiv Sena BJP Alliance) सरकारमध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री होते.
मनोहर जोशी हे मूळचे बीडचे असून त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातील नादवी गावात झाला.
शिक्षणानिमित्त ते मुंबईत स्थलांतरीत झाले. ते M.A. L.L.B होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) अधिकारी म्हणून नोकरी केली.
मनोहर जोशी यांचे जावाई गिरीश व्यास (Girish Vyas) यांना पुण्यातील कर्वे रोडवर इमारत बांधायची होती.
मात्र हा भूखंड शाळेसाठी आरक्षित होता. त्यावेळी मुख्यमंत्री असल्याने ही फाईल त्यांच्यासमोर आली.
तेव्हा त्यांनी शाळेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलल्याचा ठपका ठेवण्यात आला.
यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी एक चिठ्ठी वर्षा बंगल्यावर पाठवली.
मनोहर जोशी यांनी आधी तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर (Governor P.C. Alexander)
यांच्याकडे राजीनामा द्यावा आणि मगच मला भेटायला यावं, असा निरोप बाळासाहेब ठाकरे यांनी पाठवला.
हा निरोप मिळाल्यानंतर क्षणाचाही विचार न करता मनोहर जोशी यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला.
Web Title : Former CM Manohar Joshi | former cm manohar joshi admitted to hinduja hospital
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा