Homeताज्या बातम्याहिमाचाल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन

हिमाचाल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन

सिमला : वृत्त संस्था – हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते वीरभद्र सिंह Former Chief Minister Virbhadra Singh (वय ८७) यांचे दीर्घ आजाराने पहाटे निधन झाले. सिमला येथील आयजीएमसी हॉस्पिटल (IGMC Hospital) मध्ये पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. former himachal pradesh chief minister virbhadra singh passes away

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

वीरभद्रसिंह (Chief Minister Virbhadra Singh) यांच्यावर गेल्या २ महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. त्यांनी दोन वेळा कोरोना संसर्गावर मात केली होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना व्हँटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

वीरभद्र सिंह (Chief Minister Virbhadra Singh) हे हिमाचल प्रदेशचे ६ वेळा मुख्यमंत्री बनले होते. ९ वेळा आमदार आणि ५ वेळा खासदार म्हणून ते निवडून आले होते. सध्या ते सोलन जिल्ह्यातील अरकीचे विद्यमान आमदार होते.  आमदार, मुख्यमंत्री, खासदारसहीत अनेक पदांवर त्यांनी काम केले. त्यांच्या नावावर अनेक राजकीय विक्रम आहेत. वीरभद्र सिंह  यांनी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात खाण मंत्री म्हणून काम केले होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

 

Web Title : former himachal pradesh chief minister virbhadra singh passes away

Pune Police News | 27 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार, पोलिस कर्मचार्‍याला पोलिस कोठडी

Basmati Rice | ‘किंग ऑफ राईस’ – बासमती चे उत्पादन कमी – ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार

Mumbai-Kolhapur Special Train | मुंबई-कोल्हापूर विशेष सेवा सुधारित क्रमांक व संरचनेसह धावणार

 

Pune Police News । RTI कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेचे 9 ‘फॉलोअर्स’ पुणे पोलिसांच्या ‘रडार’वर

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News