Former MLA Harshvardhan Jadhav | माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका, दिल्लीत नितीन गडकरींच्या घरी असताना आला Heart Attack

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Former MLA Harshvardhan Jadhav | माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने त्यांना तातडीने दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात (RML Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांना काही कामानिमित्त भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, प्रकृती बिघडल्यानंतर जाधव (Former MLA Harshvardhan Jadhav) यांनी व्हिडिओ तयार करुन स्टेटसला ठवून तब्येतीची माहिती दिली आहे.

कन्नड विधानसभा मतदारसंघाचे (Kannada Assembly Constituency) माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Former MLA Harshvardhan Jadhav) हे गेल्या काही दिवसांपासून विगवेगळ्या राजकीय पक्षांच्या संपर्कात असल्याने चर्चेत होते. नुकताच त्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात (Bharat Rashtra Samiti Party) प्रवेश केला आहे. मार्च महिन्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Telangana CM Chandrasekhar Rao) यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात (BRS Party) प्रवेश केला आहे.

हर्षवर्धन जाधव यांच्यावर रुग्णालयावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. व्हिडिओत ते म्हणाले की, भारत माता की जय, देशाची काळजी घ्या, महाराष्ट्राची काळजी घ्या, कन्नड सोयगाव मतदार संघाची काळजी घ्या, चांगलं वागा, चांगल्या लोकांशी बोला. जगलो वचालो तर पुन्हा भेटू, असं जाधव यांनी म्हटले आहे.

तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणाले की, मला बहुतेक अटॅक आलेला आहे. माझं एनजीओ प्लास्टी झालं आहे.
मी गडकरी साहेबांच्या घरी होतो. मला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन चालले आहेत. मी दिल्लीला आहे.
माझं डोकं खूप दुखत असून छातीत कळा निघत आहे आणि घाम आला आहे.
मला शासनाच्या गाडीने रुग्णालयात घेऊन जात आहेत, असं स्वत: हर्षवर्धन जाधव व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

कोण आहेत हर्षवर्धन जाधव?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पहिल्यांदा 13 आमदार निवडून आले होते. त्यात एक हर्षवर्धन जाधव होते.
औरंगाबादच्या कन्नड मतदारसंघातून ते विजयी झाले होते. परंतु त्यानंतर मनसेला रामराम करत हर्षवर्धन जाधव
यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकिटावरही त्यांनी निवडणूक जिंकली.
मात्र शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला.
त्यानंतर आता त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | …अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री बनणार नाहीत, शिवसेना आमदाराचा इशारा

Swarad Foundation Pune | स्वारद फाऊंडेशन ट्रस्ट आणि हिंदू जनजागृति समितीच्या वतीने युवती व महिलांना मोफत शौर्य प्रशिक्षण