काय सांगता ! होय – होय, मनमोहन सिंगांच्या परदेश दौर्‍याची संख्या PM नरेंद्र मोदींपेक्षा देखील जास्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेश दौरे हा नेहमीच विरोधकांचा टीकेचा विषय राहिला आहे. यावरून भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर प्रतिहल्ला करत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षाही जास्त परदेश दौरे केला असा दावा केला आहे.

काँग्रेसवर टीका करताना अमित शाह म्हणाले की , ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे हजारो लोक विमानतळाबाहेर जमा होतात आणि मोदींच्या नावे घोषणाबाजी करतात. यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखत आहे. त्यामुळेच मोदी खूप परदेश दौरे करतात असा आरोप काँग्रेस नेहमीच करत असतं.’

यावेळी अमित शाह यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेतील ह्युस्टन येथे पार पडलेल्या नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाचा उल्लेख करत नरेंद्र मोदी जगातील सर्वात प्रसिद्ध पंतप्रधान असल्याचे सिद्ध होत आहे असे सांगितले. तसेच त्यांनी मोदींच्या मुत्सद्दीपणामुळे भारताचं जागतिक स्थान उंचावत असून अनेक परदेशी गुंतवणूक भारतात होत असल्याचा दावा केला आहे.

मनमोहन सिंग यांच्यावीषयी बोलताना अमित शाह म्हणाले की, ‘ मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षाही जास्त परदेश दौरे केले आहेत. मनमोहन सिंग कागदावर जे लिहिलं आहे, जे मॅडम लिहून द्यायच्या तेच वाचायचे. मनमोहन सिंग यांनी मलेशियात रशियासाठी लिहिलेलं भाषण वाचलं होतं.’

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यावरुन नेहमी मोठी चर्चा केली जाते. पंतप्रधान मोदी हे देशात कमी आणि विदेशात जास्त असतात अशी विरोधकांकडून टीका केली जाते.

visit : Policenama.com