4 तप ‘सत्तेच्या पडछायेत’ असणारा प्रशासक काळाच्या पडद्याआड ! माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे निधन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे ओएसडी, कुशल प्रशासक असणारे राम खांडेकर (Ram Khandekar)  (वय ८७) मंगळवारी रात्री उशिरा दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा मुकुल, सुन संगीता आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. राम खांडेकर (Ram Khandekar)  यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सरंक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण ते माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे खासगी सचिव म्हणून जवळपास ४ तपाहून अधिक काळ दिल्लीतील महत्वाच्या राजकीय घडामोडीचे साक्षीदार ठरले होते.

मध्य प्रदेशातील शासकीय कार्यालयात हिंदी स्टेनोग्राफर ते पंतप्रधानाचे खासगी सचिवांपर्यंत राम खांडेकरांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.
१९७२ मधून ते शासकीय नोकरीतून निवृत्त झाले होते.
त्यांनी तब्बल ५२ वर्षे सरकारी नोकरी केली.
त्यापैकी ४५ ते ४६ वर्षे यशवंतराव चव्हाण, मोहन धारिया, वसंतराव साठे, पी व्ही़ नरसिंह राव यांच्या सहावासात त्यांचे वैयक्तिक सचिव म्हणून काम केले.
नरसिंह राव हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.
त्यावेळी त्यांनी सेवानिवृत्त झालेल्या राम खांडेकर यांच्याकडे आपल्या मतदारसंघाची जबाबदारी सोपविली होती.

त्यानंतर राव पंतप्रधान झाल्यावर सप्टेंबर १९९२ मध्ये नरसिंह राव यांनी राम खांडेकर यांची आपले वैयक्तिक ओएसडी म्हणून नेमणूक केली.
दोघेही चांगले मराठी बोलत असल्याने त्यांचा संवाद हा मराठीतून होत असे.
नरसिंह राव यांच्या पंतप्रधानांच्या काळातील जवळपास सर्व प्रमुख घटनांचे राम खांडेकर हे साक्षीदार होते.
जानेवारी २००६ मध्ये खांडेकर हे नागपूरला आपल्या मुळ गावी परतले.

खांडेकर हे अनेक मराठी वृत्तपत्रांमध्ये लिहित असत. त्यांच्या सेवा कालावधीतील राजकीय व्यक्तिमत्वांबरोबर झालेल्या संवादाविषयी त्यांनी अनेक दिवाळी अंकांमध्ये लेख लिहले होते.
यशवंतराव चव्हाण ते नरसिंह राव अशा दिग्गज राजकीय नेत्यांचे वैयक्तिक सचिव म्हणून ४ तपांची शासकीय सेवेतील कारकीर्द व्यतीत केलेले राम खांडेकर यांनी आपली लेखनकला हरवू दिली नाही.

सत्तास्थानाच्या अगदी निकट राहताना खांडेकर यांनी कितीतरी उलथापालथी जवळून पाहिल्या. राजकारणातले ताणेबाणे विणताना, उसवताना पाहिले. मात्र, सत्ताधुमाळीतही आपली ऋजुता खांडेकरांनी हरवू दिली नाही. ना आपला नि:स्वार्थीपणा हरपू दिला. यशवंतरावांचा, नरसिंह रावांचा विश्वास खांडेकरांनी जिंकला तो आपल्या सचोटीच्या बळावर, सचिव असूनही ते होयबा झाले नाहीत, प्रसंगी ठाम नकारही देऊ शकले ते प्रामाणिकतेच्या जोरावर, ऐतिहासिक घटनांनी भरलेले, आणि भारलेले अर्धशतकाचा काळ जवळून निरखलेल्या खांडेकर यांनी सत्तेच्या पडछायेत हे आत्मचरित्रपर पुस्तकात अनेक पडद्यामागील घटनांचा समावेश आहे.

हे देखील वाचा

कामाची गोष्ट ! Aadhaar चं मोबाइल अँप देईल 35 पेक्षा जास्त सुविधा; UIDAI नं लाँच केलं mAadhaar चं नवं ‘व्हर्जन’, जाणून घ्या

धक्कादायक ! भाजप नेत्याचे मॉडेलसोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, प्रचंड खळबळ

 

तुरुंगातील ‘या’ अभिनेत्यांवरुन दोन अभिनेत्रीमध्ये रंगल Twitter war, ती म्हणाली – ‘तुला का मिर्ची लागली?

 

तसेच फेसबुक पेज ला लाईक करा

 

ट्विटर ला देखील फॉलो करा