राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते म. गो. वैद्य यांचे निधन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन –   राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते, पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य (वय 97) यांचे ( Former spokesperson of RSS Ma Go Vaidya passes away ) शनिवारी (दि.19) दुपारी साडेतीनच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.

मा. गो. वैद्य हे परखड मतांसाठी ओळखले जात होते. ते तरुण भारतचे माजी मुख्य संपादक होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यामुळे त्यांना स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दरम्यान शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. वैद्य यांची अंत्ययात्रा रविवारी (दि.20) सकाळी 9.30 वाजता त्यांच्या राहते घर- 80, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर-22 येथून निघणार आहे. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

वैद्य यांच्या मागे पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन, श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम व मोठा आप्त परिवार आहे.