आॅपरेश आॅल आऊट स्टार्ट, काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगरः वृत्तसंस्था-
रमजान महिन्यामध्ये काही दिवसासाठी बंदुकींना दिलेला विराम आता परत मागे घेतल्यानंतर भारतीय लष्कारानं जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा आॅपरेशन आॅल आऊट ला सुरूवात केली आहे. या आॅपरेशन दरम्यान सर्च आॅपरेशन करत असताना सुरक्षा दलाने आज बांदीपुरा परिसरात चार दहशदवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बांदीपुरातील बिजबेहारा परिसरात अतिरेकी दबा धरून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. माहितीची खात्री केल्यानंतर आज सकाळी सुरक्षा दलाने संपूर्ण बिजबेहारा परिसरात सर्च आॅपरेशनला सुरूवात केली. त्यावेळी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी सुरक्षा दालाने चार अतिरेक्यांचा खात्मा केला. दरम्यान या आधी 14 जून रोजी सुरक्षा दलाने दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातलं होतं. त्यामध्ये एका जवान शहिद झाला होता. तसेच 28 जून पासून अमरधाम यात्रेला सुरूवात होणार आहे. या यात्रेवर अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे केंद्र सरकारने शस्त्रसंधी पुढे सुरू

बांदीपुरातील बिजबेहारा परिसरात अतिरेकी लपल्याची खबर सुरक्षा दलाला मिळाली होती. ही खबर मिळताच सुरक्षा दलाने आज सकाळी संपूर्ण बिजबेहारा परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं. त्यावेळी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांदरम्यान ही चकमक उडाली. त्यात चार अतिरेकी ठार झाले. या आधी १४ जून रोजी सुरक्षा दलाने दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातलं होतं. त्यात एक जवानही शहीद झाला होता.