धुळ्यापाठोपाठ मालेगावात जमावाची चार जणांना मारहाण

मालेगाव : पोलिसनामा ऑनलाईन 

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून मालेगावात संतप्त जमावाने चार जणांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आझाद नगर परिसरात ही घटना घडली आहे. यावेळी पोलिसांच्या वाहनांचीही जमावाने तोडफोड केली.  दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या चार जणांची संतप्त जमावाच्या तावडीतून सुटका केली. यानंतर या चौघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
[amazon_link asins=’B015QWEHLO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=”]
दरम्यान, धुळ्यात मुले पळवणारी टोळी समजून संतप्त जमावाने 5 जणांना बेदम मारहाण केली, या घटनेत त्या पाचही जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आतापर्यंत २३ जणांना अटक करण्यात आली आहे.

या अगोदर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चांदगाव भागात ८ जूनला चोर समजून सात जणांना बेदम मारहाण करण्यात आली त्यात दोघांचा मृत्यु झाला.

औरंगाबादमधीलच पडेगाव येथे १६ जून रोजी ईद मागण्यासाठी आलेल्या दोन बहुरुप्यांना मारहाण करण्यात आली होती.

कमळापूरमध्ये महिला नव्या घराच्या शोधात असताना मुले पळविण्याच्या संशयावरुन जमावाकडून मारहाण केली गेली.

लातूरमधील औसा तालुक्यातील बोरफळामध्ये २९ जूनला नवरा बायकोच्या भांडणाला मुले पळविण्याचे स्वरुप देऊन मारहाण झाली.नंदूरबारमध्ये भिक्षुकी करणाऱ्या पाच जणांना जमावाकडून २९ जून रोजी मारहाण करण्यात आली. मुलगी तिच्याच घरात सापडल्याने प्रकरणावर पडदा पडला. परभणीत २० जूनला मुळ पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन दोन जणांना मारहाण करण्यात आली. नंतर त्यांना पोलिसांना देण्यात आले.