‘कमवा आणि शिका’ योजनेत लाखोंचा गैरव्यवहार, पुणे विद्यापीठातील तिघांविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये कमवा आणि शिका या योजनेत विद्यापीठाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन समन्वयकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी योजनेत काम न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावाने पैसे घेऊन विद्यापीठीची फसवणूक केली आहे.

अमोल भनुदास मगर (रा. मारवाड, ता. माळशिरस), सागर तानाजी काळे (रा. पळसदेव, ता. इंदापूर ) आणि किरण गायकवाड (रा. मुढाळे, ता. बारामती) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थी विकास महामंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई (वय ४३, रा. शिक्षक निवास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेले तिघेही समन्वयक असून त्यांनी गैरव्यवहार केल्याची तक्रार डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेले तिघेही कमवा व शिका योजनेतील समन्वयक असून त्यांनी कमवा व शिका योजनेत खोट्या विद्यार्थ्यांची नावे दिली. जे विद्यार्थी या योजनेत काम करत नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या नावाने पैसे उकळले. योजनेचे पैसे बनावट विद्यार्थ्यांच्या नावाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करून ते पैसे त्यांच्याकडून रोख स्वरुपात घेतले.

तिघांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाची ३ लाख ४६ हजार ८६० रुपयांची फसवणूक केली आहे. डॉ. देसाई यांच्या तक्रारीवर पोलिसांनी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एस.डी. दराडे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय