‘TV’ ऑन केला तर हार दिसते, अर्थव्यवस्था ‘ICU’मध्ये असल्यासारखी : ‘पाक’चे मुख्य न्यायाधीश

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तान दिवसेंदिवस नव्या संकटात सापडत आहे. त्यामुळे तेथील लोकांना पाकिस्तानसंबंधी काही चांगल्या बातम्या येणंही बंद झाले आहे. पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश आसिफ सईद खोसा यांनी यावर आपले मनोगत व्यक्त केले. पाकिस्तान या काळात अर्थव्यवस्थेत, राजकारणात आणि क्रिकेटच्या विश्वातही निराशाजनक बातम्या ऐकत आहे, असं त्यांनी म्हटलं. बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी, ‘देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे’, ही चांगली बातमी नाही, असं वक्तव्य केलं.

आम्ही अर्थव्यवस्था ऐकलं तर असंच वाटत की ही अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे किंवा आयसीयूतून बाहेर आली आहे. आम्ही संसदेतून येणारा आवाज ऐकतो आणि पाहतो की विरोधी पक्षाच्या नेत्याला घरातल्या नेत्याशी बोलण्याची परवानगी नाही. हे निराशाजनक आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळे पाकिस्तानचे तहरीक-ए-इंसाफ आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज यांच्यातील मतभेद दिसुन येतात, असंही त्यांनी सांगितलं.

क्रिकेटच्या विश्वचषकात भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानला भारताने ८९ धावांनी पराभूत केले होते. त्यावरही त्यांनी वक्तव्य केले. आम्ही चॅनेल बदलतो आणि क्रिकेट विश्वचषककडे बघतो, निराशाजनक अहवाल दिसत आहेत. अशा त्रासदायक वातावरणात पाकिस्तानच्या लोकांना जे चांगल्या बातम्या फक्त पाकिस्तानच्या न्यायालयातून ऐकू येत आहेत.

देशाच्या अर्थव्यवस्था, राजकारण आणि क्रिकेट कोणत्याही क्षेत्रातून चांगली बातमी मिळत नाहीये. फक्त कोर्टाकडून चांगली बातमी ऐकली जाते. पाकिस्तानी न्यायव्यवस्थेत आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चा वापर केला जात आहे. त्यामुळे न्यायालयातील कामकाज आणि निकाल लवकर लागत आहेत. या व्यवस्थेमुळे सत्याच्या जवळ जाण्यास मदत होते. दरम्यान, पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय हे जगातले पहिले असे न्यायालय आहे, ज्याने ऑनलाइन प्रकरणांची सुनावणी सुरू केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

दुधी भोपळ्याची भाजी खाल्ल्यास दूर पळतील अनेक आजार

प्राचीन ग्रंथांमध्ये सूखी वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधी शास्त्रीय माहिती

तेजस्वी डोळ्यांसाठी गुणकारी औषधी वनस्पतींचा वापर

डोकेदुखीची वेदना एक…परंतु, कारणे असू शकतात वेगवेगळी