दहशतवाद्यांचा ‘३५०’ चा आकडा आला तरी कसा …

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्टाईकनंतर विरोधकांनी या घटनेचे पुरावे मागायला सुरवात केली. तसेच यावर विविध प्रश्न उपस्थितीत केले असतांना, आज कॉंग्रेसचे नेते व माजी केंद्रिय मंत्री पी.चिदंबरम यांनी आमची शंका एअर स्ट्राईक नाही , पण बालाकोट येथे केलेल्या हल्ल्यात ३५० दहशतवादी मारले गेले, असी माहीती आली तरी कुठून व असे सांगितले तरी कोणी, असा सवाल टि्वटद्वारे पी. चिदंबरम यांनी केला आहे.
त्यांनी टि्वट करतांना असे ही म्हटले की, बालाकोटमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाचे कौतुक करणारे राहुल गांधी हे पहिले राजकारणी होते . हे आता मोदी विसरले आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पाटण्यात घेतलेल्या संकल्प रँलीत विरोधकांवर एअर स्ट्राईकचा पुरावा मागीतल्या बद्दल टीका केली होती.
या अशा गोष्टीमुळे सैन्याचे मनोबल कमी होत आहे. असे ही मोदी म्हणाले. परराष्ट्र मंत्रालयाने असे सांगितले की , या स्ट्राईकमध्ये कोणीही नागरीक किंवा सैनीक मारले गेले नाहीत.तसेच भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक विषयी अधिक माहिती द्यायला नकार ही दिली आहे. तर ३५० दहशतवादी ठार झाल्याचा आकडा आला तरी कसा,असा थेट सवाल पी . चिदंबरम यांनी टि्वटद्वारे केला आहे.