Gadchiroli Accident News | दुचाकीची झाडाला धडक; अपघातात मामा-भाचीचा दुर्देवी मृत्यू

गडचिरोली : Gadchiroli Accident News | पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी (Degree Admission) एटापल्लीकडे दुचाकीने जात असताना वेलमागडजवळ दुचाकी झाडावर आदळल्याने मामा आणि भाचीचा मृत्यू (Death) झाला. नथ्थु पुसू हिचामी (Naththu Pusu Hichami) (वय, 25, रा. जीवनगट्टा) असे मामाचे नाव असून रोशनी बंडू पदा (Roshni Bandu Pada) (वय, 22, रा. पिपली बुर्गी) असे भाचीचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नथ्थू हिचामी हा कामानिमित्त बहिणीच्या घरी पिपली (Pipli) (बुर्गी) गावात गेला होता. तो आपल्या गावी जीवनगट्टा येथे परत येण्याकरिता निघाला. नथ्थूची चुलत भाची रोशनी हिला एटापल्ली येथील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे ती एटापल्ली पर्यंत येण्यासाठी नथ्थूच्या दुचाकीवर बसली. पिपली (बुर्गी) गावाजवळून 4 किमी अंतरावर वेलमागड गावाजवळ दुचाकीची झाडाला धडक बसली. (Gadchiroli Accident News)

या घटनेत नथ्थूचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर रोशनी गंभीर जखमी (Seriously Injured) झाली. तिला पिपली (बुर्गी) गावात नेल्यानंतर तिचाही काही वेळाने मृत्यू झाला. रोशनी बारावी उत्तीर्ण झाली होती. तिला पुढील शिक्षण घ्यायचे होते. पण पदवीचे स्वप्न अपूर्णच राहिले. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title : Gadchiroli Accident News | an uncle and a niece died in an accident in gadchiroli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा