Gandhi Godse-Ek Yudh | ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी अभिनेत्री रेखाने वेधले सर्वांचे लक्ष; फोटो वायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Gandhi Godse-Ek Yudh | सध्या ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे. या चित्रपटांच्या प्रदर्शना अगोदर या चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक कलाकार मंडळींनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी अभिनेत्री रेखाने (Rekha) मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. नेहमीप्रमाणे रेखा तिच्या अंदाजात दिसत होती. रेखाची झलक सर्वांनाच आकर्षित करत होती. (Gandhi Godse-Ek Yudh)

 

यावेळी अभिनेत्री रेखा सोबत राजकुमार संतोषीची (Rajkumar Santoshi) मुलगी तनिषा संतोषी (Tanisha Santoshi) देखील दिसली होती. यावेळी तनिषानी रेखाच्या पाया पडून आशीर्वाद घेतले तर रेखाने तिला मिठी मारत चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Gandhi Godse-Ek Yudh)

 

हा चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात महात्मा गांधी यांची भूमिका गुजरात फिल्म डायरेक्टर दीपक अंतानी साकारणार आहेत. तर नथूराम गोडसे यांची भूमिका चिन्मय मांडेलकर साकारणार आहेत. तर राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिशा संतोषी देखील या चित्रपटात डेब्यू करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या स्क्रीनिंग वेळी प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी देखील उपस्थित होत्या.

 

Web Title :- Gandhi Godse-Ek Yudh | gandhi godse ek yudh screening in mumbai rekha tanisha santoshi mahima chaudhary joined

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | ‘पक्षाला पूर्णवेळ देणारा पक्षाध्यक्ष असावा, घरात बसून…’, शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Maharashtra Politics | बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणाला उद्धव ठाकरे जाणार? आदित्य ठाकरे म्हणाले…

Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान