गणेश मंडळांना बॉक्स कमानी उभारण्यास परवानगी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यामध्ये गणेश उत्सवादरम्यान मंडळांना बॉक्स कमानी उभारण्यास पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. सुरक्षीततेचा मुद्दा पुढे करत परवानगी नाकराली होती. या निर्णर्यविरोधात मंडळांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या निर्णयाबाबत आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये काही अटींवर गणेश मंडळांना बॉक्स कमानी उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’10d71d9d-b0e6-11e8-8e12-07cdfd58b86c’]

पुणे पालिकेत झालेल्या बैठकीला पालकमंत्री गिरीष बापट, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम्, पालिका आयुक्त सौरभ राव, गणेश मंडळांचे कर्यकर्ते उपस्थित होते.

पुणे पोलिसांचा प्रताप; संतोष जुवेकरवर केवळ पोस्टरवरून केला गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्ताव पुणे पोलिसांकडून मंडळांना बॉक्स कमानी उभारण्यास परवानगी नाकारली होती. गणेश मंडळांकडून सार्वजनीक ठिकाणी मंडप उभारुन बॉक्स कमानी उभारल्या जातात. या कमानींचा उपयोग समाज कंठक घेऊ शकतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असे कारण देत पुणे पोलिसांनी बॉक्स कमानींना परवानगी नाकराली होती. आज झालेल्या बैठकीमध्ये गणेश मंडळांना बॉक्स कमानी उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुणे / पिंपरी : वाहतुक शाखेतील ‘त्या’ 21 कर्मचार्‍यांची मुख्यालयात रवानगी

पालकमंत्र्यांनी उपस्थित गणेश मंडळांच्या कर्यकर्त्यांना सुचना केल्या. गणेशोत्सवात सांऊंड सिस्टीम आणि दारु पिऊन गोंधळ घालून नेय. तसेच गणेश उत्सव काळात साऊंड सिस्टीम लावणाऱ्या आणि दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना पाठिशी घातले जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कमानी उभारण्यास परवानगी आहे. मात्र, सुरक्षिततेच्या उपाययोजना मंडळांनी कराव्यात, कमानींना परवानगी असेल पण, तिचा पाच फुटांचा भाग मोकळा ठेवावा असेही पालकमंत्र्यांनी मंडळांना सांगितले. त्याचप्रमाणे न्यायालयाच्या निर्णयाला धक्का लगाणार नाही याची प्रत्येक मंडळाने काळजी घ्यावी. गणेश मंडळांना परवानगीसाठी हेलपाटे मारु देणार नसल्याचे सांगत परवानगी देण्यासाठी जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. मांडपामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी मंडळांनी घ्यावी. दारू पिऊन गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोडविणाऱ्या व्यक्तींचे नाव जाहीर करणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठकीत सांगितले.