Ganesh Raskar Murder Case | कुख्यात गुंड गणेश रासकर खून प्रकरणातील आणखी दोघांना अटक, धारदार हत्यारे जप्त

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन (Policenama Online) – पुरंदर तालुक्यातील (Purandar taluka) नीरा (Nira) येथील गुंड गणेश रासकर याच्या खुन प्रकरणातील (Ganesh Raskar Murder Case) आणखी दोघांना जेजुरी पोलिसांनी (Jejuri police) अटक करण्यात केली आहे. रासकरचा खून करण्यासाठी धारदार हत्यारांची जमावाजमव केली होती. ती हत्यारे एका खोलीतून पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. दोघांवर हत्यार बंदी कायद्याप्रमाणे (Arms Act) जेजुरी पोलीस ठाण्यात (Jejuri police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रासकर खून प्रकरणात (Ganesh Raskar Murder Case) आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. अविनाश विष्णू भोसले (वय – 27) व विठ्ठल अशोक मोहिते (वय- 21 दोघे रा. निरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सहा धारदार हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक (Police Inspector Sunil Mahadik) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.2) रोजी जेजुरी पोलीस ठाण्यात खात्रीशीर माहिती मिळाली की, नीरा या ठिकाणी काही दिवसापूर्वी गणेश रासकर या गुंडाचा खून झाला होता. त्याचा खून करण्यापूर्वी आरोपी गौरव लकडे, निखील रवींद्र डावरे व कटात सहभागी असणारा गणेश जाधव यांनी गणेश रासकर याला संपवण्यासाठी हत्यारांची जमवाजमव केली होती. ही हत्यारे अविनाश विष्णू भोसले व विठ्ठल अशोक मोहिते यांच्या ताब्यात दिली होती.

तसेच त्यांनी जर कोणास माहिती दिली तर त्यांना सुद्धा मारण्याची धमकी दिली होती.
परंतु वरील तिघांनी गुंड गणेश रासकर याचा पिस्तुलाने गोळ्या घालून खून केला.
परंतु जी धारदार हत्यारे गणेश रासकरला मारण्यासाठी आणून ठेवली होती.
ती नीरा येथील एका खोलीत दोघांच्या ताब्यात अद्यापही आहेत अशी माहिती मिळाली.
पोलीस पथकाने नीरा येथे जाऊन शोध घेतला असता त्याठिकाणी 6 धारदार हत्यारे मिळाली.
त्यामुळे सध्या जिल्हाधिकारी यांचा हत्यार बंदी आदेश लागू असल्याने त्याचंही उल्लंघन केल्याने अविनाश भोसले, विठ्ठल मोहिते व जेलमध्ये असणारे निखील डावरे, गौरव लकडे, गणेश लक्ष्‍मण जाधव व जगन्नाथ जाधव यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 27 व हत्यार बंदी कायदा कलम 425 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Pune Rural Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Additional Superintendent of Police Milind Mohite),
उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील (Sub-Divisional Police Officer Dhananjay Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, फौजदार नंदकुमार सोनवलकर, कैलास गोतपागर, पोलीस हवालदार संदीप कारंडे, संदीप मोकाशी पोलीस नाईक धर्मवीर खांडे, चालक पोलीस नाईक भानुदास सरक, पोलीस शिपाई तात्यासाहेब खाडे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Ganesh Raskar Murder Case | Two more arrested in notorious goon Ganesh Raskar murder case, sharp weapons seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Yo Yo Honey Singh | यो यो हनी सिंहच्या विरूद्ध पत्नीने दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा

Pune News | सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीस वरदान ठरणार्‍या राजाराम पुल ते फन टाईम उड्डाणपुलाच्या निविदेला मंजुरी

Pimpri Crime | पुण्यातील उद्योजक नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाडसह टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई