अन् मनसे कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्तांच्या खुर्चीलाच घातला हार 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई महापालिकेने नुकतीच गणेशोत्सव नियमावली प्रसिद्ध केली आहे. गिरगावात गणेशोत्सवातील कठोर नियमांवरुन मुंबई महापालिका प्रशासन आणि मनसे- शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद पेटला आहे. आज (सोमवार) मनसे कार्यकर्त्यांनी डी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्या खुर्चीला कार्यालयाबाहेर आणून हार घातला.

कुठलीही नोटीस न देता गिरगांवच्या राजाचा गणेशमंडप तोडण्यासाठी पालिका प्रशासनाचे अधिकारी गेले होते. मात्र, त्यांना कारवाई करु दिली नाही. नोटीस न देताच अशा कारवाईला मंडळांचा विरोध आहे.

[amazon_link asins=’B07CC1X3DY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’792a7298-996d-11e8-99e3-3318e7ba8219′]

या सर्व गोंधळामुळे पोलिसांनी मनसे आणि शिवसेनेच्या 20-22 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. शिवसेनेचे गिरगांव येथील विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

नियम

मंडपाच्या बाजूला 10 फूट जागा सोडावी, फायर ब्रिगेड, अम्ब्युलन्स, पादचाऱ्यांसाठी जागा असावी.
मंडप उभारण्याआधीच  बीएमसी, पोलिस, ट्रॅफीक, फायर ब्रिगेड यांचा परवाना घेणे आवश्यक.
मंडपापासून 100 मी दूर भक्तांच्या गाड्यांचं पार्किंग
खड्डे जर खणले तर गणेशविसर्जनानंतर 10 दिवसांत बुजवले पाहिजेत. त्याचे फोटो महापालिकेला पाठवावे.
मंडपात फायर रेझिस्टंट सिस्टम असावी. मंडपाच्या बाहेर मंडपाच्या नकाशाचा आराखडा असणे आवश्यक
 [amazon_link asins=’B07BHVY55G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8c533c04-996d-11e8-9830-ed728e59fa50′]

मंडळांची हरकत

गिरगांवमध्ये चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये अशा पद्धतीनं मंडप उभारणे शक्य नाही.
ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया किचकट आहे, नोंदणी आणि परवानग्या मिळण्यास वेळ लागतो, त्यामुळे एकीकडे ही प्रकिया सुरु असतानाच मंडळे मंडप उभारणीस सुरुवात करतात.
चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये पार्कींगसाठी जागा निर्माण करणे शक्य नाही

खालील लिंकच्या सहाय्याने पोलीसनामाचे फेसबूक पेज लाईक करा
https://www.facebook.com/policenama/