Gangadham – Kondhwa Road Hilltop Hill Slope Zone | गंगाधाम परिसरातील हिलटॉप हिलस्लोपवरील बेकायदा गोदामांविरोधात लवकरच कारवाई

‘जळीतकांडा’नंतर महापालिका प्रशासनाने उचलले पाउल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Gangadham – Kondhwa Road Hilltop Hill Slope Zone | गंगाधाम ते कात्रज-कोंढवा दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या बेकायदा गोदामांबाबत महापालिका Pune Municipal Corporation (PMC) लवकरच कठोर पावले उचलणार आहे. हिलटॉप हिलस्लोपवर बेकायदा बांधकामांना महापालिकेने नोटीसेस बजावल्यानंतर त्याविरोधात अनेक व्यावसायीकांनी न्यायालयातून स्थगिती आदेश मिळविला आहे (Court Stay Order). परंतू रविवारी घडलेल्या ‘जळीतकांडा’च्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन स्थगिती उठविण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याची माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे (City Engineer Prashant Waghmare) यांनी दिली. (Gangadham – Kondhwa Road Hilltop Hill Slope Zone)

 

गंगाधाम ते कात्रज- कोेंढवा रस्त्याच्या दरम्यान बिबवेवाडी (Bibvewadi) आणि कोंढव्याच्या सिमेवर मोठ्या प्रमाणावर गोदामे झाली आहेत. विकास आराखड्यामध्ये हा परिसर हिलटॉप, हिलस्लोपमध्ये असतानाही ही गोदामे झाल्याने त्यांना तीनपट टॅक्स आकारण्यात आला आहे. तसेच बांधकाम विभागाने वेळोवेळी नोटीसेस बजावून काही गोदामे पाडली देखिल आहेत. परंतू यानंतरही अनेकांनी महापालिकेच्या नोटीसेस विरोधात न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. दरम्यान, रविवारी सकाळी येथील गोदामांना आग लागली. या आगीमध्ये तब्बल २० हून अधिक गोदामे जळून खाक झाली. गोदामांकडून जाणारे अरुंद रस्त्यांमुळे अग्निशामक दलाच्या गाड्यांना आतमध्ये शिरणे देखिल अवघड जात होते. अशाही परिस्थितीत अग्निशामक दलाच्या १०० हून अधिक जवानांनी २२ फायर टेंडरच्या मदतीने चार तासांनंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने दिवसाउजेडी ही घटना घडल्याने त्यावर मात करणे शक्य झाले. हीच घटना रात्रीच्यावेळी घडली असती तर परिसरातील वस्त्यांनाही त्याची झळ पोहोचली असती.

या पार्श्‍वभुमीवर शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले महापालिकेने बेकायदा गोदामांवर वेळोवेळी कारवाई केली आहे. परंतु या विरोधात गोदामांचे मालक न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली आहे. ही सर्व स्थगितीची प्रकरणे एकत्र करून न्यायालयात पुन्हा एकदा वस्तुस्थिती मांडून स्थगिती उठविण्यासाठी पावले उचलत आहोत. स्थगिती उठताच व्यापक कारवाई करण्यात येईल.

 

Web Title :  Gangadham – Kondhwa Road Hilltop Hill Slope Zone | Pune Municipal Corporation Will
Take Action against illegal godowns soon – City Engineer Prashant Waghmare

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा