MLA Manisha Kayande | मनिषा कायंदेंची आमदारकी रद्द होणार? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाच्या (Thackeray Group) विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (MLA Manisha Kayande) यांनी शिवसेना वर्धापन दिनाच्या (Shiv Sena Vardhapan Din) पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मनिषा कायंदे (MLA Manisha Kayande) यांचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) मोठा धक्का मानला जात आहे. कारण मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केल्याने ठाकरे गटाचे विधान परिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडे असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे.

 

मनिषा कायंदे (MLA Manisha Kayande) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्यामुळे त्यांची आमदारकी जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) म्हणाले, शिवसेना अधिकृत पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे विधान परिषदेचे (Legislative Council) विद्यमान आमदार कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला तरी ती अपात्रता मानली जात नाही. कारण मी शिवसेनेतच आहे, शिवसेना सोडलेली नाही असा त्यांचा युक्तिवाद असू शकतो. मात्र हा नर्णय 10 व्या परिशिष्ठानुसार विधान परिषदेच्या सभापतींना द्यायचा आहे. त्यांचा निर्णय अंतिम असं त्यांनी म्हटलं.

याशिवाय विधान परिषदेत ठाकरे गटाचे नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नऊ आमदार आहेत.
दोघांचे संख्याबळ सारखे आहे. विरोधी पक्षनेता म्हणून ठाकरे गटला मान्यता मिळाली आहे.
मात्र, दुसऱ्या गटाने त्यावर दावा केला तर विधान परिषदेच्या सभापतींना हा गुंता सोडवावा लागू शकतो.
कोणाकडे बहुमत आहे हे सभापती ठरवतील असं उज्ज्वल निकम म्हणाले.
त्यामुळे आगामी काळीत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title :  MLA Manisha Kayande | will manisha kayandes mlc be cancelled senior legal expert ujjwal nikam says

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा