Maharashtra Politics News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावताना अजित पवार पत्रकारांना म्हणाले ‘तुम्हाला महाराष्ट्रात रहायचे आहे की नाही?’ (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ही जाहिरात राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. या जाहिरातीमध्ये एका सर्व्हेनुसार फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पसंती देण्यात आल्याचे म्हटलं होतं. यातच आणखी एक सर्व्हे समोर आला आहे. (Maharashtra Politics News) त्यामध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना पसंती देण्यात आली आहे. यावर पुण्यात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

 

 

 

नव्याने आलेल्या सर्व्हेबाबत अजित पवार यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी टोलेबाजी केली. तुम्ही काय बोलताय? किती धादांत खोटे बोलत आहात. तुम्ही परवा जाहिरात बघितली नाही. मुख्यमंत्रीपदाच्या पाठिंब्याकरिता आम्हाला 26 टक्के मते मिळाली आहेत आणि तुम्ही काही तरीच सांगत आहे. तुम्हाला महाराष्ट्रात रहायचे आहे की नाही, असं सांगत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टोला लगावला. (Maharashtra Politics News)

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute) येथे सोमवारी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीत राज्याचे साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली.
या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil),
काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम (Congress MLA Vishwajit Kadam), बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil),
भाजप नेते हर्षवर्धन पाटील (BJP Leader Harshvardhan Patil) उपस्थित होते.
या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | journalists asked questions to ajit pawar in pune regarding survey

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा