Ajit Pawar | विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार का?, अजित पवार म्हणाले-‘आम्ही निश्चितपणे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानपरिषदेच्या (Legislative Council) आमदार मनिषा कायंदे (MLA Manisha Kayande) यांनी ठाकरे गटातून (Thackeray Group) शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे. विधानपरिषदेत भाजपनंतरचा (BJP) सर्वात मोठा पक्ष म्हणून ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळाळे होते. ठाकरे गटाकडे 10 आमदार होते. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (MLA Ambadas Danve) सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी (NCP) विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार का असा प्रश्न अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारण्यात आला. यावर स्मितहास्य करत अजित पवार (Ajit Pawar) यांनी आम्ही निश्चितपणे विचार करु असे सांगितले.

 

विधान परिषदेत ठाकरे गटाकडे 10 तर शिंदे गटाकडे एक आमदार होता. तसेच राष्ट्रवादीकडे 9 तर काँग्रेसकडे 8 आमदार (Congress MLA) असून 5 अपक्ष आमदार आहेत. त्यापैकी किशोर दराडे (Kishore Darade) यांनी ठाकरेंना तर सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. दराडे यांनी पाठिंबा बदलला तर मात्र गेम बदलू शकतो. दरम्यान, मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता विधान परिषदेत ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 9 आमदार आहेत.

 

मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे माध्यमांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे (Assembly) विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना याबाबत विचारले की, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार का? यावर अजित पवार यांनी स्मितहास्य करत म्हणाले, तुम्ही हे आमच्या लक्षात आणून दिल्यामुळे आम्ही निश्चितपणे यावर विचार करु.

 

अजित पवार म्हणाले, आमची राष्ट्रवादीची बैठक आधीच ठरली आहे. जयंत पाटील (Jayant Patil) आणि मी फार आधीच ती ठरवली आहे. या बैठकीचा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कसलाही संबंध नाही. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही 9 जूनला जी सभा घेणार होतो, ती पावसामुळे घेता आली नाही. ती निमंत्रितांची सभा 21 जूनला आयोजित केली आहे. स्वत: शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी ती सभा ठेवली आहे.

 

लगेच काहीतरी बातम्या चालवू नका

आमची महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आहे. लगेच तुम्ही काहीही बातम्या चालवू नका.
विधानसभा, विधान परिषद ज्या वेळेस विरोधी पक्षनेतेपद देण्याची वेळ येते त्यावेळी ज्यांच्या सर्वाधिक जागा त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं.
2014 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे 41 आमदार होते, काँग्रेसचे 42 आमदार होते.
तेव्हा शेकापचे तीन सदस्य होते. ज्यांना आम्ही म्हणजेच राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. आमची आघाडी होती.
म्हणजेच आमच्याकडे 44 आमदार होते. तरी देखील 5 वर्ष ते पद काँग्रेसकडे होतं, असं अजित पवार यांनी सांगितलं.

 

निश्चितपणे विचार करु

अजित पवार पुढे म्हणाले, त्यावेळचे (2014) विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे (Assembly Speaker Haribhau Bagde) यांनी सांगितलं
ज्या पक्षाचे सर्वात जास्त सदस्य त्यांचा आमदार मी विरोधी पक्षनेता म्हणून जाहीर करणार.
तुम्ही सांगताय त्याबद्दल आम्ही कोणताही विचार केलेला नाही.
मात्र तुम्ही हे लक्षात आणून दिल्यामुळे आम्ही निश्चितपणे यावर विचार करु.

 

 

Web Title :  Ajit Pawar | ajit pawar answer on will ncp claim leader of the opposition in legislative council

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा