एअर होस्टेसवर सामूहिक बलात्कार, मुख्य आरोपी गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमध्ये एका २५ वर्षीय एअर होस्टेसवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली आहे तर त्याचे इतर दोन साथिदार फरार आहेत. आरोपीला १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वप्नील बदोनिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी आणि पीडित एअर हॉस्टेस एकाच कंपनीत कामाला आहेत. सोमवारी हैद्राबादहून मुंबईत आली होती. आरोपी स्वप्नील हा कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सोमवारी दोघेजण मिळून एकाच टॅक्सीतून निघाले. स्वप्नील मालाडच्या मॉलमध्ये उतरला तर पीडित तरुणी घरी गेली. काहीवेळाने तरुणी मॉलमध्ये आली.

मॉलमधील बारमध्ये पीडित तरुणी आणि स्वप्नीलने मद्यपान केले. तरुणीला मद्यपान जास्त झाल्याने तीने हॉटेलमध्ये घेऊन जाण्यास स्वप्नीलला सांगितले. मात्र, दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याने हॉटेल मालकांनी त्यांना रुम देण्यास नकार दिला. अखेर स्वप्नील याने पीडित मुलीला आपल्या मित्रांच्या खोलीवर घेऊन गेला. या ठिकाणी स्वप्नील आणि त्याच्या इतर दोन मित्रांनी तीच्यावर बलात्कार केला.

दुस-या दिवशी तरुणीला जाग आली असता तीच्या शरीरावर जखमा झाल्याचे दिसले. तीने याविषयी स्वप्नीलकडे चौकशी केली असता त्याने आपण शुद्धीवर नसल्याचे सांगत विषय टाळला. तरुणीने घरी येऊन घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी आणि पीडित मुलीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वप्नील आणि त्याच्या इतर दोन मित्रांविरुद्ध फिर्य़ाद दिली. पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून स्वप्निलला अटक केली. पीडित तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.