संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकीच्या खून प्रकरणी गँगस्टर शरद मोहोळ, भालेरावची निर्दोष मुक्‍तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकीच्या खून प्रकरणी कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ आणि त्याचा साथीदार भालेराव यांना शिवाजीनगर येथील न्यायालयाने निर्दोष मुक्‍त केले आहे. मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी कतिल सिद्दीकीचा 8 जून 2012 रोजी येरवडा कारागृहातील अंडासेलमध्ये बुर्मडयाच्या नाडीने गळा आवळून खून केला होता.

शरद हिरामण मोहोळ (रा. मारूलीनगर, सुतारदरा – कोथरूड, ता. मुळशी) आणि आलोक शिवाजीराव भालेराव (28, रा. मु.पो. मुठा, ता. मुळशी) अशी निर्दोष सुटका करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मोहोळ आणि भालेराव यांनी दोघांनी मिळुन संशयित दहशतवादी मोहम्मद कातिल मोहम्मद जाफर सिद्दीकी उर्फसज्जन उर्फ साजन उर्फ शहाजादा सलीम (मुळ रा. बिहार) याचा खून केला होता. या खटल्यानंतर अनेकांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या होत्या. खटल्यादरम्यान उलटतपासणी देखील झाली होती. दरम्यान, आज (दि. 26 जून) शिवाजीनगर न्यायालयाने मोहोळ आणि भालेराव यांना निर्दोष मुक्‍त केले आहे. खटल्यातील सर्वच साक्षीदार फितूर झाले आहेत. सबळ पुराव्या अभावी हि निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे

कोण होता कातिल सिद्दीकी

जर्मन बेकरी स्फोटाच्या वेळेस पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकी हा इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा संशयीत दहशतवादी असल्याचे एटीएसने केलेल्या तपासामध्ये निष्पन्‍न झाले होते. दिल्‍ली पोलिसांनी 6 दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यामध्ये कातिलचा समावेश होता. दि. 13 फेब्रुवारी 2010 रोजी कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला होता. त्याचा तपास एटीएस करीत होते. अटकेनंतर सिद्दीकीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती.

कोण आहे कुख्यात गँगस्ट शरद मोहोळ
शरद मोहोळ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी आणि दरोडा या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्याच्याविरूध्द मोक्‍का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. वारजे पोलिसांनी त्याला एका सरपंचाचे अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. कारागृहात असताना त्याने अंडासेलमधील संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकीचा खून केला होता.

आरोग्य विषयक वृत्त

‘या’ घरगुती टिप्स वापरा आणि चेहऱ्याचा तेलकटपणा आणि पिंपल्स घालवा

वजन घटवायचंय… मग शांत झोप घ्या !

‘नाईट क्रीम’ ठेवते त्वचेला तजेलदार आणि तरुण

पुण्यात इनामदार हॉस्पिटल तर्फे वारकऱ्यांसाठी विनामूल्य आरोग्य शिबीर