गांजा बाळगणार्‍याला रांजणगाव MIDC पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शिरुर तालुक्याच्या रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत गांजा बाळगल्याप्रकरणी युवकास अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी पोलिस काॕस्टेबल सुरज वळेकर यांनी फिर्याद दिली असून मयूर रावसाहेब रूके (रा.गणेगाव खालसा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी मयूर हा गांजा बेकायदेशीरपणे जवळ बाळगून असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता आरोपिकडे दोन किलो वजनाचा खाकी कागदी पाकिटात पॅक बंद असलेला गांजा,तसेच सात प्लॅस्टिक पॅकबंद पुड्यात गांजा मिळून आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे.पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस करत आहेत.