‘केवळ बोलून चालत नाही तर कर्तृत्वसुद्धा लागते’ ; गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना टोला 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे नाशिकची महापालिका होती. त्यांनी तिथे काय करुन दाखवले? आणि आता केवळ २ नगरसेवक निवडून आले आहेत. केवळ बोलून चालत नाही, कर्तृत्वसुद्धा लागते, असा टोला जलसंपादन मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान राज ठाकरेंकडे एक आमदार होता, तोही सोडून गेला. आता, लाव रे व्हीडिओ एवढच काम राज ठाकरेंना उरले आहे. राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते, पण त्यांच्याकडे निवडून कुणीही येत नाही. त्यांच्या सभेने केवळ करमणूक होते, पण रिझल्ट काय? असे जलसंपादन मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले. याचबरोबर यांच्याकडे नाशिकची महापालिका होती. त्यांनी तिथे काय करुन दाखवले? आणि आता केवळ २ नगरसेवक निवडून आले आहेत. यावरुन लक्षात येते केवळ बोलून चालत नाही, कर्तृत्वसुद्धा लागते. कर्तृत्वाशिवाय तुम्हाला कुणीही मानत नाही, असेही त्यांनी म्हटले.

तसेच, राज ठाकरे क्लीप दाखवतात, आवाज काढतात, खरे तर आपण कुठे आहोत, कुणाबद्दल बोलत आहोत, कुठे नरेंद्र मोदीजी, कुठे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, असा टोलाही त्यांनी लगावला. याचबरोबर व्हीडिओबद्दल बोलायचे झाले तर, आम्हीही त्यांचे जुने व्हीडिओ काढून दाखवले तर मोदींची स्तुती करताना राज ठाकरे थकत नव्हते. त्यामुळे आता राज ठाकरेंना आम्हीच एक प्रश्न विचारतो. एक माणूस एवढा बदलूच कसा शकतो ? असेही त्यांनी म्हटले.

इतकेच नव्हे तर, राज ठाकरे जेथे सभा घेतात तेथे आमचाच उमेदवार निवडूण येईल. राज ठाकरेंच्या सभांमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.