Gauahar Khan Dance Video | गौहर खाननं शेअर केला जबरदस्त डांसचा व्हिडिओ, Video पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Gauahar Khan Dance Video | सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल गौहर खान सोशल मीडियावर सध्या जास्त एक्टिव पाहायला मिळते. गौहर खान अलीकडेच जैद दरबार सोबत लग्नबंधनात अडकली. गौहर आणि तिचा पती जैद दरबार (Zaid Darbar) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असतात. ते दोघं नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ (Gauahar Khan Dance Video) इंस्टाग्रामवर शेअर करत असतात.
गौहर खाननं (Gauahar Khan) नुकतंच एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. गौहरने ‘हाय लेडीज (Hey Ladies)’ या गाण्यावर हा व्हिडिओ तयार केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिनं काळ्या रंगाचा क्रोप टॉप आणि खाली काळ्या रंगाची ट्राउजर घातली आहे. ती यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिनं शेअर केलेल्या व्हिडिओखाली कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘जेव्हा तुम्ही अबुधाबीला (abu dhabi) एक्सप्लोर करत असतात, तेव्हा इथे करण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत.’ तर तिच्या या व्हिडीओला किश्वर मर्चेंटनं (Kishwer Merchant) कमेंट केली असून, अनेक कलाकारांनी या व्हिडिओला लाईक् केलंय.
दरम्यान, आत्तापर्यंत गौहरच्या या व्हिडिओला (Viral Video) 5 तासात जवळपास 98 हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. तर व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करून आपले प्रेम व्यक्त केले आहे, तर या व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.
Web Title :- Gauahar Khan Dance Video | gauahar khan dance video gauahar khan dances in a stylish style in abu dhabi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Esha Gupta Bold-Hot Photos | ईशा गुप्ताच्या डिपनेक गाऊननं सोशल मीडियाचा वाढवला पारा, पाहा बोल्ड फोटो
Kiara Advani Bold Photo | कियारा अडवाणीचे बोल्ड फोटो पाहून चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो
Pune Crime | दारु पिण्यास अटकाव केल्याने डोक्यात फोडली बिअरची बाटली; चतुःश्रृंगी परिसरातील घटना