एशिया पॅसिफिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गौरव घुलेला सुवर्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या एशिया पॅसिफिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेत पुण्याच्या गौरव घुले याने सुवर्णपदक पटकाविले आहे. महिला गटात पुण्याच्या रोहिणी बन्सलने सुवर्णपदक आणि दिपा लुंकड हिने रोप्य पदक मिळविले.
गौरव ने ९३ किलो वजनी गटात डेडलिफ्ट मध्ये २८५ किलो, स्क्वाट मध्ये २३५ किलो, बेंचप्रेस मध्ये १७२.५ किलो असे एकुण ६९२.५ किलो वजन उचलून सुवर्णपदकाला गवसणी घातली. या कामगिरी मुळे त्याची जुन महिन्यात स्वीडनमध्ये होणाऱ्या जागतिक पॉवरलिफ्टींग अजिंक्य पद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

गेल्या दोन वर्षात गौरवने कामगिरीच्या जोरावर जिल्हा, राज्य ,राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. सलग तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्ण कामगिरी केली. गेल्या वर्षी त्याने मंगोलिया येथे पार पडलेल्या एशिया पॅसिफिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते. त्यावेळी सुवर्ण पदकाने हुलकावणी दिल्यामुळे या वर्षी गौरवने जोरदार तयारी केली होती. त्यांनी विक्रमी कामगिरी करत या स्पर्धेत यावर्षी सुवर्णपदक मिळवले. यूझीलंड ऑस्ट्रेलिया या देशाचे खेळाडू अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर राहील.

जागतिक स्पर्धेच्या तयारीविषयी गौरव म्हणाला,” पुढील काळातील टेक्निक सुधारण्यावर भर देणार आहे. वजन उचलताना योग्य पध्दत वापरणे, स्नायू दुखावता कामा नये याची काळजी आणि मार्गदर्शन, प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे. त्या स्पर्धेत सातशे किलोपेक्षा अधिक वजन उचलण्याचा माझे ध्येय आहे. सरावाच्या वेळी मी सव्वा सातशे किलो वजन उचलले आहे. परंतु स्पर्धेच्या कालावधीत अशी कामगिरी करणे वेगळे असते. प्रशिक्षक मोनिष राजवाडे आणि वडील गणेश घुले यांचे मार्गदर्शन मला मिळत आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचे माझं ध्येय आहे.”

Loading...
You might also like