जनुकीय विकार आणि वंधत्व !

पोलीसनामा ऑनलाइन – तुम्हाला माहित आहे का ? अनुवंशिक कारणांमुळे बर्‍याच स्त्रिया गर्भधारणा करू शकत नाहीत. यामागे अनुवांशिक विकार आणि पालकांकडून मुलाकडे दोष निर्माण होणं हे कारणं असू शकते. यासाठी विशिष्ट गुणसूत्र दोष असलेल्या जोडप्यांना प्री-इम्प्लांटेशन अनुवांशिक निदान (पीजीडी) तसेच इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) ही उपचारपद्धती फायदेशीर ठरू शकते. याबद्दल अधिक जाणून घेऊया.

वंधत्व हे अनुवांशिक आजारांमुळेही येऊ शकतं. वंधत्वासाठी कारणीभूत असलेल्या कारणांमुळे गुणसूत्रे आणि जनुकीय दोषांचे एक महत्त्वाचे कारण आहे. उदाहरणार्थ, जर पालकांपैकी एखाद्यास थॅलेसीमिया किंवा सिकलसेल सारख्या काही आजार असल्यास ते गर्भास त्रासदायक ठरू शकतात. कारण ज्या जोडप्यांमध्ये जनुकीय दोषांमुळे वंधत्व आलेले असते, त्यांना उपचारानंतर संतती तर होऊ शकते. मात्र होणाऱ्या संततीला जनुकीय विकार/आजार असण्याचा धोका बराच अधिक असतो. याशिवाय वारंवार गर्भपात होणं हे देखील यामागील मुख्य कारण असू शकतं.

वंधत्व असलेल्या जोडप्यांनी जनुकीय तपासणी करून घेतल्यास वंधत्वाचे निश्चित निदान करता येते आणि उपचारानंतर जन्माला आलेल्या बाळाला जनुकीय विकार टाळण्यास मदत होते. त्यामुळे अनुवांशिक विकार टाळण्यासाठी प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस (पीजीडी) या चाचणीद्वारे एखाद्याला गुणसूत्र दोष आहे की नाही, हे ओळखण्यास मदत करू शकते. याशिवाय या चाचणीतून पालकांमधील आजार बाळाला संसर्ग होतोय किंवा नाही, याचे निदान अचूक करता येते. त्यामुळे वंधत्व असणाऱ्या दाम्पत्यांना ही वैद्यकीय चाचणी फायदेशीर ठरू शकते. वंधत्वाची आणि जनुकीय समस्या सोडवण्यासाठी ही उपचारपद्धती वापरली जाते.

इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) ही एक जैविक प्रक्रिया आहे. या उपचारपद्धतीमध्ये शुक्रांणू आणि स्त्रीबीज ह्यांच्यामध्ये प्रयोगशाळेत संयोग घडवून आणला जातो आणि गर्भाशयाच्या मुखातून गर्भ गर्भाशयात सोडला जातो. अशाप्रकारे आयव्हीएफ बाळाची गर्भधारणा होते. आजकाल आयव्हीएफ उपचार हा सर्वसामान्य दाम्पत्यांसाठी फायदेशीर ठरू लागला आहे. या प्रक्रियेत पहिल्यांदा पुरूषाचे शुक्राणू आणि स्त्रीचे बीजअंड घेऊन प्रयोगशाळेत त्याच मिलन केलं जातं. त्यानंतर गर्भाशयात सुपित अंडी रोपण केली जाते. स्त्रीला अंडी परिपक्व करण्यासाठी आणि गर्भधारणा करण्यासाठी तयार करण्यासाठी औषध दिली जातात. त्यानंतर स्त्री गर्भवती होऊ शकते.

प्री-इम्प्लांटेशन अनुवांशिक निदान (पीजीडी) बद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक

प्री-इम्प्लांटेशन अनुवांशिक चाचणी गर्भधारणेपूर्वी इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) द्वारे केली जाते. याद्वारे गर्भातील बाळाला कुठलाही अनुवांशिक दोष नाही ना हे ओळखणं सोपं होतं. जेणेकरून वेळीच निदान करून बाळाला हा आजार होण्यापासून रोखता येऊ शकतं. पीजीडी विट्रो फर्टिलायझेशनच्या सामान्य प्रक्रियेपासून सुरू होते ज्यात प्रयोगशाळेत अंडी पुनर्प्राप्ती आणि गर्भधारणेचा समावेश असतो.

पीजीडी निदान कोण करू शकतः-

· नात्यातील लग्न करणाऱ्या व्यक्ती

· वारंवार रोपण अयशस्वी

· ज्यांना आयव्हीएफ उपचारात यश प्राप्त झालेले नाही.

· जनुकीय विकार असलेल्या व्यक्ती

· ३५ किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या महिला

· ४० वर्षांवरील पुरुष

· वारंवार गर्भपात झालेल्या महिला

डॉ. करिश्मा डफळे ( नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर, पुणे)