…तेव्हा ‘त्यांनी’ राज ठाकरेंचीही कानउघाडणी केली होती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ अजाराने निधन झाले आहे. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते उत्तम कामगार नेते म्हणून ओळखले जायचे. या कामगारांना न्याय मिळावा यासाठी जॉर्ज यांनी काम केले आहे. या कामगारांसाठी त्यांनी चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही समजावले होते.

जॉर्ज फर्नांडिस हे एनडीएचे संयोजक होते, त्यावेळची ही घटना आहे. त्यावेळी जॉर्ज यांनी उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरुन २००८ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची चांगलीच कान उघाडणी केली होती. तेव्हा राज ठाकरेंनी मुंबईतील उत्तर भारतीयांविरोधात अभियान सुरु केलं होतं.

त्या काळात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईत आलेल्या उत्तर भारतीयांना मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. तेव्हा जॉर्ज यांनी थेट राज ठाकरेंनाच पत्र लिहिले होते. ज्या उत्तर भारतीयांना महाराष्ट्रातून बाहेर जाण्यास भाग पाडले. तसेच, त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणाऱ्या गुंडांना त्यांची माफी मागायला लावा, असं जॉर्ज यांनी सांगितलं होतं. याशिवाय, उत्तर भारतातून विशेषता बिहार आणि उत्तर प्रदेशामधून आलेल्या मुंबईतील टॅक्सीचालकांवरील हल्ल्याप्रकरणी त्यांनी राज ठाकरेंना जाब विचारला होता.

दरम्यान, जॉर्ज नेहमीच कामगारांच्या न्यायासाठी लढले. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी नेतृत्व केले.

You might also like